ऑनलाईन वर्गात प्रवेश घेऊ शकली नाही, विद्यार्थीनीने केली आत्महत्या

केरळ : वृत्तसंस्था-   नववीत शिकणाऱ्या दलित विद्यार्थीनीला ऑनलाईन वर्गात प्रवेश घेता आला नाही. यामुळे नैराश्येतून या तिने आत्महत्या केली. तिच्याकडे स्मार्ट फोन नसल्याने आणि घरातील टीव्ही खराब असल्याने तिला ऑनलाईन वर्गात प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे तिने नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.1) संध्याकाळी केरळ मधील वॅलॅन्चेरी येथे घडली.

केरळमधील नवीन शैक्षणिक सत्र सोमवारी ऑनलाइन वर्गांसह सुरु झाले. काही तासांपूर्वीच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थीनीने आत्महत्या केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केरळमध्ये शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्गाला सुरुवात झाली आहे.

पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देविका असे आत्महत्या करणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. तिने सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. तिचे वडिल बाळकृष्ण यांनी सांगितले की देविका हुशार होती आणि ती अस्वस्ते होती. कारण घरातील टीव्ही बऱ्याच दिवसांपासून खराब झाला होता आणि घरात कणाकडेही स्मार्ट फोन नव्हता. तिच्या आजिने सांगितले की, डिजिटल वर्गात प्रवेश घेता न आल्याने तिला नैराश्य आले होते. त्यातूनच तिने आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like