सुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर बनणार ‘बायोपिक’, निर्मात्यांमध्ये चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ‘जलेबी’ चित्रपटाची अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंग यांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून चर्चेत आहे. सध्या ड्रग्ज प्रकरणात ती तुरूंगात आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर चित्रपट निर्मात्यांना बायोपिक बनवायची आहे अशी चर्चा आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार,

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार असे अनेक चित्रपट निर्माते आहेत, ज्यांना रिया चक्रवर्तीच्या जीवनावर बायोपिक बनवायची आहे. रियाच्या जीवनावर सध्या एक माहितीपट तयार केला जात असल्याचेही बोलले जात आहे. फिल्म आणि डॉक्युमेंटरी व्यतिरिक्त पब्लिशिंग हाऊस रियाच्या जीवनावर पुस्तक प्रकाशित करण्याची योजना आखत आहे. अशी अपेक्षा आहे की, रिया तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल लिहिेल आणि तिची गोष्ट पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना सांगेल.

रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रियाची पहिले तीन दिवस सलग चौकशी केली, त्यानंतर तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. मुंबई न्यायालयाने रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळत तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ केली आहे.

याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा हाऊसकिपर दिपेश सावंत आणि दोन ड्रग्ज पॅडलर्सलाही अटक केली आहे. नुकतेच बॉलिवूडमधील चार सेलिब्रिटी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने चौकशी केली. तसेच आता २०१७ पासून ते आतापर्यंत या चौघींच्या आर्थिक नोंदींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like