सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची CBI चौकशी व्हावी, रिया चक्रवर्तीची HM अमित शहांकडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अजूनही हे समजले नाही की, सुशांतने आत्महत्या का केली. आता या प्रकरणी रिया चक्रवर्तीने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय तपासाची मागणी केली आहे. रियाने सुशांतचे फोटो शेयर करत लिहिले आहे की, आदरणीय अमित शाह सर, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, त्याच्या आकस्मिक निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे, परंतु मी न्यायासाठी आपल्याकडे हात जोडून मागणी करते की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी. मला फक्त इतकेच जाणून घ्यायचे आहे की, सुशांत अशा कोणत्या दबावात होता की त्याने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सत्यमेव जयते.

यापूर्वी रियाने सुशांतच्या निधनाला एक महिना झाल्याने इमोशनल पोस्ट शेयर केली होती. रियाने लिहिले होते, अजूनही आपल्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तुच मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले होतेस, त्याची ताकद मला जाणवून दिलीस. तुच मला शिकवलेस एक गणिताचे एक सामान्य समीकरण कसे जीवन यशस्वी बनवते. मला महिती आहे की, आता तू आणखी शांतपूर्ण ठिकाणी आहेस. चंद्र, तारे, अकाशगंगा यांनी खुल्या हाताने तुझे स्वागत केले असेल. मी तुझ्यासाठी वाट पाहिन. तू ते सर्वकाही होतास, जो एक सुंदर मनुष्य असू शकतो.

ट्रोलरची घेतली शाळा

एका ट्रोलरने लिहिलेले वाईट शब्द वाचल्यानंतर रियाने सोशल मीडियावर त्याची भरपूर शाळा घेतली. रियाने त्या यूजरच्या मॅसेजचे स्क्रीन शॉट शेयर करत लिहिले, मला मर्डरर म्हटले गेले मी गप्प बसले. माझ्यासाठी वाईट शब्द वापरले गेल, मी तरीसुद्धा गप्प राहिले. परंतु, माझे गप्प बसणे तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कसा देते की, मी आत्महत्या नाही केली तर माझा रेप आणि मर्डर केला जाईल. मी सायबर क्राईम हेल्पलाइनला रिक्वेस्ट करते की, त्यांनी यावर कठोर अ‍ॅक्शन घ्यावी. खुप झाले आता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like