अर्जुन तेंडुलकरच्या एका ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने केल्या 21 धावा, खेळली 120 धावांची ताबडतोब इनिंग

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या सत्रात सूर्यकुमार यादवने नुकतीच मुंबई इंडियन्सकडून शानदार प्रदर्शन केले आणि आता सय्यद मुश्ताक अली टी -20 स्पर्धा त्याच फॉर्मसह खेळण्यास सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली टी -20 टूर्नामेंट 10 जानेवारी 2021 रोजी खेळले जाणार असून त्याच्या एका सराव सामन्यात सूर्यकुमारने आपल्या फलंदाजीने चौकार आणि षटकार ठोकले. सूर्यकुमारने 47 चेंडूत 120 धावांची खेळी खेळली आणि या दरम्यान त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा केल्या.

आयपीएलमध्ये सूर्यकुमारच्या कामगिरीचा विचार करता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी -20 संघात सहभागी होईल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही आणि त्याबाबत बरेच वादही झाले. सय्यद मुश्ताक अली टी -20 स्पर्धेच्या सराव सामन्यात सूर्यकुमारने पुन्हा एकदा फलंदाजी केली. सराव सामना टीम बी (कॅप्टन सूर्यकुमार यादव) आणि टीम डी (कॅप्टन यशस्वी जयस्वाल) यांच्यात झाला. तिसर्‍या क्रमांकावर सूर्यकुमार फलंदाजीसाठी आला आणि त्याने विरोधी संघाकडून कोणताही गोलंदाज सोडला नाही.

तेंडुलकरच्या एका ओव्हरमध्ये त्याने 6, 4, 2, 4, 4, 1 च्या मदतीने 21 धावा केल्या. लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने या ओव्हरव्यतिरिक्त सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याच्या खात्यातील चार षटकांत 33 धावा खर्च करून अर्जुनने एक विकेट घेतली. सूर्यकुमारबद्दल बोलायचे म्हणले तर त्याने या खेळीदरम्यान 10 चौकार आणि 9 षटकार लगावले. सूर्यकुमारने 255.32 च्या स्ट्राइक रेटने ही धावा केल्या.