India vs England : कर्णधार विराट कोहलीने केले कन्फर्म, पहिल्यांदा टी20 मध्ये रोहित शर्मासोबत केएल राहुल करणार ओपनिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी20 मॅचपासून विराट कोहलीने भारताच्या ओपनिंग जोडीच्या नावाचा खुलासा केला आहे. कोहलीने सांगितले की, पहिल्यांदा टी20 स्पर्धेत रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंग करताना दिसेल. विराटने हे सुद्धा स्पष्ट केले की, या दोघांना आराम दिला जाण्याच्या स्थितीमध्येच शिखर धवनला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. पाच मॅचच्या टी20 सीरीजची पहिली मॅच आज 12 मार्च (शुक्रवार) ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.

एएनआयशी बोलताना टीम इंडियाच्या कर्णधाराने केएल राहुलची बाजू घेत म्हटले की, त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा रेकॉर्ड क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये खुप दमदार आहे. हे खुप सिंपल आहे, केएल राहुल आणि रोहित टॉप ऑर्डरमध्ये आपल्यासाठी चांगली कामगिरी करत आहेत आणि ते दोघेच सुरुवात करतील. आणि जर रोहितने आराम घेतला किंवा इतर कारण असेल तर शिखर धवन तिसरा सलामी फलंदाज म्हणून टीममध्ये येईल. सुरुवातीच्या मॅचेसमध्ये रोहित आणि राहुल डावाचा प्रारंभ करतील.

भारताने इंग्लंडच्याविरूद्ध होणार्‍या टी20 सीरीजसाठी अनेक तरूण खेळाडूंना टीममध्ये सहभागी केले आहे. आयपीएलमध्ये लागोपाठ चांगली कामगिरी करणारे सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि ईशान किशनला टीममध्ये संधी दिली गेली आहे. तर, भुवनेश्वर कुमार आणि टेस्ट मॅचेसमध्ये लागोपाठ दमदार कामगिरी करत असलेला ऋषभ पंत टीममध्ये परतला आहे. जसप्रीत बुमराहला या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. भारताने इंग्लंडला टेस्ट सीरीजमध्ये 3-1 ने पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.