आई-वडिलांनी रागावलं म्हणून घर सोडलं, अडकली सेक्स रॅकेटच्या गाळात, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली :वृत्तसंस्था- मध्यप्रदेशातील एक अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तीन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या माहितीनंतर आणि चाईल्ड हेल्प लाईन संस्थेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी हि मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातील रहिवासी असून एक महिना आधी आई वडिलांबरोबर झालेल्या भांडणामुळे तिने घर सोडले होते. त्यानंतर ती रॉबर्टगंजमध्ये आली.

तिथे स्टेशनवर तिला तीन महिला भेटल्या. त्यानंतर त्या महिला तिला एका गावात घेऊन गेल्या आणि दुसऱ्या महिलेकडे सुपूर्द केले. त्यानंतर या महिला दोन तीन दिवसांनी या मुलीला एखाद्या हॉटेलवर किंवा घरात घेऊन जाऊन तिला मादक पदार्थ खायला घालून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत. या महिलांच्या तावडीतून सुटण्याचा तिने अनेक वेळा प्रयत्न केला. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी या महिला तिला रॉबर्टगंज मधील एका हॉटेलमध्ये घेऊन आल्या होत्या. त्यावेळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर तिने नागरिकांच्या मदतीने पोलिसांना फोन केला. त्यावेळी पोलिसांनी चाईल्ड हेल्प लाईनला फोन करून यासंदर्भातील माहिती दिली.

दरम्यान, मुलीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून या तीन महिलांना हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्यांना देखील महिला सुधार गृहात पाठवण्यात आले असून पुढील प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या