home page top 1

घरभाडे घेण्यासाठी मालक पोहचला, महिलेला एकटीच पाहून थेट आतच घुसला

नोएडा : वृत्तसंस्था – एका घरमालकाने भाडे घेण्याच्या बहाण्याने महिलेला घरात एकटी पाहून तिच्यावर अत्याचार केला आहे. सदर धक्क्कादायक घटना नोएडातील छलेरा गावात घडली आहे. याविषयी महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. या घटनेपासून आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिस उपअधीक्षक श्वेताभ पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी आरोपी घरमालक महिलेच्या घरी भाडे घेण्यासाठी पोहोचला. त्यावेळी सदर महिलेचा पती घरी नव्हता. महिला भाडे देऊ लागली तेव्हा घरमालक म्हणाला, मी नंतर पुन्हा भाडे घेण्यासाठी येईल. महिला घरात गेली तेव्हा आरोपीही तिच्या मागे मागे गेला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.

पीडित महिलेने तिच्या पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. याबाबत तिच्या पतीने पोलिस स्टेशन सेक्टर-39 मध्ये तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार आहे, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like