एकदा ‘अँटीबॉडी’ तयार झाल्यास पुन्हा ‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणाचा धोका नाही, वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच दिला दुजोरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमानानंतर शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीमुळे पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका नाही. असा दावा पहिल्यांदाच वैज्ञानिकांनी केला आहे. आत्तापर्यंत या मुद्द्यावर वेगवेगळे दावे करण्यात आले होते. मात्र या अँटिबॉडी किती काळापर्यंत शरीरात राहतील याबाबाबत मात्र कोणताही खुलासा अद्याप झाला नाही.

नेचर मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनचे स्कूल ऑफ मेडीसीनचे निर्माते अलेक्झांडर ग्रेनिंजर यांच्या टीमने याबाबतचा दावा केला आहे.

शोधानुसार, जहाजेने येणाऱ्या 122 क्रू मेम्बरपैकी 120 जणांची कोरोना चाचणी ते निघण्यापूर्वी केली असता ती निगेटिव्ह आली होती. यामध्ये तीन जण असे होते ज्यांच्या शरीरात कोरोना अँटिबॉडी तयार झाल्या होत्या. त्यामध्ये कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्याची प्रक्रिया दिसून आली. म्हणजे ते यापूर्वीच कोरोना संक्रमण होऊन बरे झाले होते. पण नंतर 18 दिवसात या जहाजेत कोरोना संक्रमण वाढले. यातील 104 लोकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

कोरोनाचे संक्रमण 85.2% वेगाने होत होते. या दरम्यान त्या तिघांना कोरोनाची लागण नाही झाली ज्यांच्या शरीरात अँटिबॉडी होत्या. या लोकांना 32 दिवस परीक्षण केले गेले. मेड रेक्सीव जर्नलने हा पूर्ण रेकॉर्ड प्रकाशित केला. रक्तात असणाऱ्या अँटिबॉडीे कोरोना संक्रमनापासून बचाव करतात.

अशा प्रकारे संक्रमण कालावधीत देखील अँटिबॉडीमुळे संरक्षण होण्यास मदत होत आहे. पण त्या अँटिबॉडीे किती कालावधीपर्यंत राहतील याबाबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. ज्या लोकांच्या शरीरात या अँटिबॉडीे तयार झाल्या आहेत त्यांच्यावर रिसर्च करून पुढील माहिती मिळवता येऊ शकते.

भारतासोबत अनेक देशात शोध सुरु

शरीरात अँटिबॉडीे तयार झाल्या तर संक्रमणाचा धोका राहणार नाही, त्यामुळे आता भारतासोबतच अनेक देशांमध्ये याबाबतचा शोध सुरु आहे. ज्या लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे त्यांच्या शरीरातील अँटिबॉडीेचा नमुना घेऊन त्यावर संशोधन सुरू आहे.