पाठीमागून आली वेगवान कार, वळून न पाहताच टायगर श्रॉफनं केला ‘खतरनाक’ स्टंट (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आला आहे. टायगरनं खूपच खतरनाक स्टंट केला आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू झाली आहे. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.

टायगरनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात टायगर खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एक कार वेगाने टायगरच्या मागून येते आणि टायगर मागे न पाहताच बॅक फ्लिप मारतो आणि ही कार टायगरच्या खालून अलगद निघून जाते. काळजाचा ठोका चुकवणारा असा हा स्टंट आहे. सध्या टायगरचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत असून 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे की, व्हिडीओ पाहून त्यांच्या अंगवार काटा आला आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.