IPS महिलेशी वकिलांनी केलं ‘गैरवर्तन’, पोलिस-वकिलांमधील भांडणाचे नवे 2 VIDEO आले समोर (व्हिडिओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तीस हजारी कोर्टात 2 नोव्हेंबरला झालेले नाट्य सर्वांनीच पाहिले. या दिवशी दिल्ली पोलीस आणि वकील यांच्याच तंबुळ हाणामारी झाली आहे. आता या हाणामारीचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओवरुन दावा करण्यात येत आहे की दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ डीसीपी मोनिका भारद्वाज यांच्यासह गैरवर्तणूक करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की मोनिका भारद्वाज यांच्या मागे कशा प्रकारे गर्दीतील लोक पळत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसते की गर्दीने पोलिसांंच्या गाडीला आग लावली आणि त्यानंतर हीच गर्दी मोनिका भारद्वाज आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे पळत आहेत.

या घटनेचे दोन व्हिडिओ आहेत, ज्यातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की गाडीला आग लावण्यात आली, परंतू जेव्हा मोनिका भारद्वाज जेव्हा या लोकांच्या गर्दीला समजवण्यासाठी गेल्या तेव्हा गर्दीतील लोकांनी त्यांना धक्के देण्यास सुरुवात केली. हे प्रकरणं चांगलेच तापले होते.

2 नोव्हेंबरला झालेल्या या धक्कादायक प्रकाराने न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यातील काही न्यायालयातील कामकाज बंद केले होते. न्यायालयाच्या परिसरात एक इमारतीवर एका वकीलांने चढून आत्महत्ता करण्याची धमकी दिली होती. परंतू काही वेळाने त्या वकीलाला इमारतीवरुन सुरक्षित उतवरण्यात आले होते.

पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटूंबियांना या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यांच्याकडून देखील आंदोलन करण्यात आले होते.

Visit : Policenama.com