U-19 WC IND vs BAN : अंतिम सामन्यानंतर झालेल्या भांडणानंतर बांगलादेशच्या 3 आणि टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना ICC नं सुनावली शिक्षा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या संघर्षाबाबत निर्णय दिला असून आयसीसीने तीन बांगलादेशी आणि दोन भारतीय खेळांडूना चांगलेच सुनावले आहे. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचे लेव्हल 3 चे उल्लंघन केल्याबद्दल पाचही खेळाडूंना फटकारण्यात आले असून त्यांच्या खात्यात डिमेरिट्स पॉईंट जोडले आहेत. बांगलादेशचे मोहम्मद तौहीद ह्रादॉय, बांगलादेशचे शमीम हुसेन आणि रकीबुल हसन आणि भारतकडून आकाश सिंग आणि रवी बिश्नोईयांनी आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे.

भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई यांच्यावरही कलम २.५ चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रविवारी बांगलादेशने भारताला तीन विकेट्सने पराभूत करून प्रथमच आयसीसी अंडर -१९ विश्वचषक जिंकला. सामन्यानंतर बांगलादेश आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंकडूनही याविषयी टीका केली गेली. भारतीय संघाचा कर्णधार प्रियांम गर्ग यांनी या घटनेस निंदनीय असल्याचे म्हटले आहे तर बांगलादेशी कर्णधार अकबर अलीनेही संघाच्या वतीने माफी मागितली.

आयसीसीचे सरव्यवस्थापक ज्यॉफ एलार्डाइस यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले की, “सामना खडतर होता, जशी अपेक्षा तुम्ही आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडून ठेवता. परंतु काही खेळाडूंनी अशी कृती केली ज्यात या खेळाला स्थान नाही.” खेळाडूंनी स्वतःला शिस्तबद्ध ठेवण्याची अपेक्षा आहे. विजयी संघाचे अभिनंदन करा आणि आपल्या संघासह विजयाचा आनंद घ्या.’ या निवेदनात ते पुढे म्हणतात की, “अशा सामन्यानंतर खेळाडूंवर आयसीसी कोड ऑफ कंडक्ट आकारला जाणे, हे दुर्दैव आहे.” या पाचही खेळाडूंनी आपली चूक कबूल केली.

खेळाडूंना मिळाली शिक्षा :
बांगलादेशच्या मोहम्मद तौहीदला 10 सस्पेंशन प्वॉइंट्स देण्यात आले आहेत, जे 6 डिमेरिट पॉईंटच्या समान आहेत आणि येणाऱ्या दोन वर्षांमध्ये ते तसेच राहतील. बांगलादेशच्या शमीम हुसेनला आठ सस्पेंशन प्वॉइंट्स देण्यात आले आहेत, जे सहा डिमेरिट पॉईंटच्या समान आहेत आणि दोन वर्षे त्यांच्या रेकॉर्डमध्ये राहतील. बांगलादेशच्या रकीबुल हसनला चार सस्पेंशन प्वॉइंट्स देण्यात आले आहेत, जे पाच डिमेरिट पॉईंटच्या बरोबरीचे आहेत आणि हे त्यांच्या येणाऱ्या रेकॉर्डसोबत दोन वर्षे कायम राहतील. भारताच्या आकाशसिंगला आठ सस्पेंशन प्वॉइंट्स देण्यात आले आहेत, जे सहा डिमेरिट पॉईंटच्या समान आहेत आणि हेदेखील दोन वर्ष त्याच्या रेकॉर्डसोबत कायम आहेत.

भारताच्या रवी बिश्नोई यांना सस्पेंशन प्वॉइंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय सामन्यादरम्यान अभिषेक दासला बाद केल्यानंतर आक्रमक उत्सहासाठी त्याच्या रेकॉर्डमध्ये आणखी दोन डिमरेट गुण जोडले गेले. दोन वर्षे त्याच्या खात्यात एकूण सात डिमेरीट पॉईंट्स राहतील. एक सस्पेंशन प्वॉइंट्स म्हणजे खेळाडू वनडे आंतरराष्ट्रीय, टी -२० आंतरराष्ट्रीय, अंडर १९ सामना किंवा ए-टीम आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही.