मोदी सरकारकडे मंत्री रामदास आठवलेंनी केली मागणी, म्हणाले – ‘अयोध्येत बनवण्यात यावे भव्य बुद्ध विहार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येत राम मंदिर सोबतच तेथे बुद्ध विहार बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आठवले म्हणाले की मंदिर स्थळ एक प्राचीन बौद्ध तीर्थक्षेत्र होते आणि म्हणूनच अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याची गरज आहे. ही मागणी मांडताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मंदिर आणि बाबरी मशिदीच्या आधी बुद्धविहार अस्तित्त्वात होते. आठवले म्हणाले, राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असून बाबरी मशिदीला देखील जागा दिली आहे, त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला देखील भव्य बुद्धविहार बांधण्यासाठी एक भूखंड देण्यात यावा.

आपली मागणी पूर्ण करण्यासाठी आपण लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी, प्रख्यात गायक आनंद शिंदे यांची देखील हीच मागणी होती, ज्यांनी सर्व दलित नेत्यांना आपले मतभेद दूर करून बुद्ध विहार उभारण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. शिंदे म्हणाले की, समतलीकरणाच्या दरम्यान तेथे प्राचीन बौद्ध वास्तू सापडल्या.

ते म्हणाले की यामुळे दलित नेत्यांनी एकत्र येऊन जागेजवळ एक संग्रहालय आणि बुद्ध विहार उभारण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख राजेंद्र गवई म्हणाले की, अयोध्या धार्मिक ऐक्याचे प्रतीक बनेल. अयोध्येत भारतातील तिन्ही प्रमुख धर्मांची उपासनास्थळे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला राम मंदिराची पायाभरणी करतील आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संपूर्ण प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे.