Coronavirus : ‘कोरोना’च्या महामारीचं संकट जूनमध्ये ‘कंट्रोल’ करून टाकू : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था – यूपी सीएम योगी आदित्यनाथ कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचे संकट दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. रोज सकाळी टीम 11 सोबत मीटिंग केल्यानंतर ते मंत्री व अन्य अधिकार्‍यांसोबत चर्चा करत आहेत. या दरम्यान सीएमने आयोजित एका कार्यक्रमात वेबनियरद्वारे म्हटले की, कोरोनाचे संकट जूनमध्ये मोठ्याप्रमाात नियंत्रणात आणू. यासाठी सपूर्ण टीम कामाला लागली आहे.

सीएम म्हणाले, आमच्या श्रमिक मजूरांमध्ये संसर्गाशी लढण्याची क्षमता आहे. ते मेहनत करून घाम गाळतात. यामुळे संसर्ग झाल्यानंतर ते सहा, सात दिवसात कोरोना निगेटिव्ह होतात. सामान्य लोक 14 ते 20 दिवसात ठिक होतात. जे लोक श्रमिकांच्या हिताबाबात मोठमोठी वक्तव्य करतात, त्यांनी या मजूरांची चिंता केली असती तर हे पलायन रोखता आले असते. आतापर्यंत 22 लाख मजूर युपीत आले आहेत. सर्वांची सन्मानाने काळजी घेतली जाईल. राज्य कर्मचार्‍यांचे भत्ते बंद करणे आणि यामुळे निवडणुकीत नुकसान होण्याबाबत विचारले असता सीएम म्हणाले, जय-पराजयाच्या नजरेने आम्ही निर्णय घेत नाही. लोककल्याणाच्या दृष्टीने आम्ही निर्णय घेतो. मीडियाने विश्वासार्ह बातम्या दिल्या पाहिजेत.

युपीत वेगाने वाढतेय कोरोना रूग्णांची संख्या
मागील 24 तासात युपीत 254 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. सर्वात जास्त 17 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नोएडात सापडले आहेत. आतापर्यंत 6268 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. यामध्ये 1569 प्रवासी मजूर आहेत. आतापर्यंत 161 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 3538 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

सामाजिक सुरक्षेची खात्री देणार
मुख्यमंत्र्यांनी टीम-11 च्या बैठकीत म्हटले की, कामगार आणि मजूरांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सामाजिक सुरक्षेची खात्री देणार. दुसर्‍या राज्यांमध्ये येथील मजूरांच्या दुरावस्थेच्या कारणामुळे आता आमच्या सरकारने विना परवानगी येथून मजूरांना बाहेरील राज्यात घेऊन जाण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रमिकांचे स्किल मॅपिंग
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर महसुल विभागाने प्रवासी मजूर-कामगारांचे स्किल मॅपिंग सुरू केले आहे. आतापर्यंत अशा दोन लाख मजुरांची नोंद केली आहे. राज्यात सुमारे 18 लाख मजूरांची विशेष पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 93 पेक्षा जास्त भाग करण्यात आले आहेत.

मजूरांचा राज्य स्तरावर विमा
कृषि विभाग तसेच दुग्ध समित्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध दिला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की, कामगार-मजूरांना राज्यस्तरावर वीमा लाभ देण्याची व्यवस्था करावी. यामुळे त्यांचे जीवन सुरक्षित होईल. अशी योजना तयार करा, ज्यामुळे त्यांना जॉब सिक्युरिटी मिळेल.

सर्वांना द्या रेशन
सर्व विभागांनी पंतप्रधानांद्वारे घोषित 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजअंतर्गत योजना बनवून तिची अंमलबजावणी करावी. प्रत्येक कामगार-मजूराला रेशन किट-रेशन कार्ड तसेच होम क्वारंटाईनच्या दरम्यान 1,000 रूपये पोषण भत्ता उपलब्ध करावा.

घरांच्या निर्मितीसाठी केंद्राला प्रस्ताव
मुख्यमंत्री म्हणाले, 20 लाख करोड रूपयांच्या आर्थिक पॅकेजअंतर्गत गृहनिर्माणसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. त्यांनी या पॅकेजमध्ये भाड्याचे घर देण्याची योजना सामिल करण्यास सांगितले. त्यांनी म्हटले की, पीएम आर्थिक पॅकेज अंतर्गत उत्तर प्रदेशला पूर्ण लाभ मिळावा, यासाठी कार्य योजना तयार करावी.