50 मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या UP च्या ज्युनियर इंजिनियरला CBIनं पकडलं, इंटरनेटवरचा घाणेरडा ‘कारनामा’ आला समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने उत्तर प्रदेश सिंचन विभागाच्या एका ज्युनियर इंजिनियरला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी 10 वर्षांपासून निष्पाप मुलांचे शोषण करत होता. इतकेच नव्हे, तो मुलांसोबत घाणेरडे कृत्य करतानाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर विकत होता. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

या केसशी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, आरोपीने चित्रकूट, बांदा आणि हमीरपूरच्या सुमारे 50 मुलांचे लैंगिक शोषण केले, ज्यांचे वय 5-16 वर्षांदरम्यान होते. आरोपीला बांदा येथून अटक करण्यात आली आहे आणि लवकरच कोर्टात हजर केले जाईल. झडतीच्या वेळी सीबीआयला 8 मोबाइल फोन, 8 लाख रुपये रोख, सेक्स टॉय, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल पुरावे मिळाले आहेत, ज्यामध्ये मुलांसोबत लैगिक शोषणाच्या व्हिडिओ क्लिप आणि फोटो आहेत.

आरोपी ज्युनियर इंजिनियर 10 वर्षांपासून हा गुन्हा करत होता. तो इंटरनेटवर व्हिडिओ आणि फोटो विकत होता. डार्कनेट आणि क्लाऊड सर्व्हरचा वापर करत जगातील दुसर्‍या पीडोफाइल्ससोबत शेअर करत होता.

तो लहान मुलांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता. तो त्यांना मोबाइल फोन आणि दुसरे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगत असे. एका पाठोपाठ एक त्याने अनेक मुलांना अशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढले. परंतु सीबीआयने आता त्याला अटक केली आहे.