जेव्हा चालू शुटींगमध्ये उर्वशी रौतेलाच्या अंगावर पडली जळती सिगारेट ! व्हिडीओ होतोय व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेल्या उर्वशीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती स्मोकिंग करताना दिसत आहे. तिनं सांगितलं आहे की, ही पहिलीच वेळ होती जेव्ही मी स्मोकिंग केली. इतकंच नाही तर यावेळचा एक किस्साही तिनं सांगितला आहे ती सिगारेट चक्क तिच्या अंगावर पडली होती.

उर्वशीचा हा व्हिडीओ गल बन गई या गाण्याच्या शुटींगचा आहे. या गाण्यात तिच्यासोबत विद्युत जामवाल दिसत आहे. यावेळचा किस्सा सांगत उर्वशी कॅप्शनमध्ये म्हणते, “गाण्याच्या शुटींगदरम्यान मला यामुळं बोलणी खावी लागली होती की, मला सिगारेट प्यायला जमत नाही. मी आरेडून सांगत होते की, मला सिगारेट पिता येत नाही. नॉन स्मोकरसाठी हे खूप अवघड असतं. स्मोकिंग आरोग्यासाठी हानिकारक आहे.”

व्हिडीओत दिसत आहे की, ती सिगारेट पिण्याची अ‍ॅक्टींग करत आहे. परंतु शेवटी तिच्या हातातून सिगारेट खाली म्हणजेच तिच्या अंगावर पडते आणि सेटवर खूप गोंधळही होत आहे. तीही जोरात किंचाळते आहे.

उर्वशीची ही पहिलीच वेळी होती की, ती स्मोक करत होती. यामुळं अनेक रिटेक घ्यावे लागले आणि उर्वशीला डायरेक्टरचे बोलणे खावे लागले होते. उर्वशीच्या या गाण्याला युट्युबवर कोटींमध्ये व्हयु आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like