अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना ‘कोरोना’ची लागण : व्हाईट हाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. व्हाईट हाऊसने सोमवारी ही माहिती दिली. ट्रम्प प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले ओ ब्रायन सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की ते एका सुरक्षित ठिकाणाहून काम करत आहेत आणि त्यांच्यापासून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना कोरोना संक्रमणाचा कोणताही धोका नाही.

ब्लूमबर्ग न्यूजने ही बातमी दिली होती, ज्यांनी सांगितले की ओ ब्रायन एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर कोरोना विषाणूच्या संपर्कात आले. याआधी अध्यक्षांचे एक वैयक्तिक सेवा देणारे आणि उपाध्यक्षांचे प्रेस सचिव यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना विषाणूची 40 लाखाहूनही अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या संपर्कात येणाऱ्या व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची दररोज कोरोना विषाणू चाचणी घेतली जाते.