विकास दुबे याच्या मृत्यूची कहाणी संपली नाही, आता पोलीस घेत आहेत यांचा शोध

कानपूर : वृत्तससंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूरच्या चौबेपुर येथे 8 पोलिसांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असलेल्या गँगस्टर विकास दुबेला मारल्यानंतर देखील पोलिसांचा तपास संपलेला नाही. पोलीस आता त्या 12 आरोपींचा शोध घेत आहेत ज्यांनी 2 जुलैच्या रात्री हे हत्याकांड केले. अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, बाकीरू हत्याकांड प्रकरणातील 21 आरोपींची ओळख पटवण्यात आली होती. तसेच 60 ते 70 इतर आरोपीही पोलिसांच्या रडावर आहेत. ते म्हणाले की, विकास दुबे याच्यासह सहा कुख्यात आरोपींचा आतापर्यंत खात्मा करण्यात आला आहे. तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रशांत कुमार म्हणाले की, 21 पैकी 12 आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. तर इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 8 पोलिसांच्या पोलिसांच्या हत्येतील मुख्य आरोपी विकास दुबे याला गुरुवारी उज्जैन येथे अटक करण्यात आली होती. कानपूर आउटनंतर आठवडाभरापासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला उज्जैनच्या महाकाल मंदिरात बाहेरून काल अटक करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला परत येत होते. पावसामुळं रस्ता काहीसा निसरडा झाला होता. बर्रा येथे असताना पोलिसांची कार अचानक रस्त्यावर उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबेला गोळी लागली आणि तो ठार झाला.