‘मेवात’च्या 50 गावात हिंदूंची संख्या झाली ‘शून्य’, ‘या’ मुद्द्यावर हरियाणा CMला भेटले VHP नेते

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मेवात मध्ये हिंदू विरोधी कारवायांबाबत विश्व हिंदू परिषदेच्या सेंट्रल जॉइंट जनरल सेक्रेटरींच्या नेतृत्वाखाली हरियाणाच्या काही सामाजिक आणि धार्मिक संघटनांसोबत व्हीएचपीच्या वरिष्ठ शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली. त्यांनी सीएम खट्टर यांना एक अहवाल देखील दिला, ज्यामध्ये म्हटले आहे की, 50 गावांमध्ये हिंदूची संख्या झिरो झाली आहे.

या शिष्टमंडळाने खट्टर यांना अहवालाची माहिती देऊन प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची, त्याचे परिणाम आणि याबाबत सूचनांची मागणी केली आहे. आपल्या वक्तव्यात या शिष्टमंडळाने म्हटले की, याशिवाय आणखी ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. सीएम खट्टर यांना प्रार्थना स्थळांमध्ये परिवर्तन करण्याच्या प्रकराबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

सुरेंद्र जैन यांनी म्हटले की, अहवालात केवळ 50 गावांबद्दलच माहिती दिली आहे, जेथे हिंदूंची संख्या झिरो झाली आहे. परंतु, जेव्हा सविस्तर सर्वे करण्यात आला तेव्हा समजले की, 103 गावे अशी आहेत जेथे हिंदूंची संख्या पूर्णपणे शून्य आहे आणि 82 पेक्षा जास्त गावे अशी आहेत जेथे पाचपेक्षा सुद्धा कमी कुटुंबं शिल्लक राहिली आहेत. व्हीएचपीचे जॉइंट सेक्रेटरी यांनी हेदेखील म्हटले की, खट्टर यांनी या सर्व बाबी गांभिर्याने ऐकून प्रकरणावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

You might also like