ओवैसींचा ‘डान्स’ पाहिला का तुम्ही ? भाषण संपल्यावर अशाप्रकारे ‘थिरकले’ (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या हजर जबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेले असदुद्दीन ओवैसी यांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. औरंबादमध्ये एक प्रचारसभा संपून मंचावरून खाली येत असताना ओवैसी यांनी चक्क डान्स केला आहे आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शुक्रवारी झालेल्या सभेत ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाला लागू करण्यासाठी सुचवले होते. तसेच पंतप्रधान सध्या एका विशिष्ठ वर्गालाच संदेश देण्यात व्यस्त असल्याचे ओवेसी यांनी सांगिलते आहे. यावेळी बोलताना एमआयएमच्या एका नेत्याने माजी पंतप्रधानांनी 1993 च्या दंगलीमधील पिडीतांबाबत न्याय केला नसल्याचे सांगितले तसेच ते म्हणाले याबाबतचे प्रकरण बंद झाले, आरोपीना शिक्षा दिली परंतु श्रीकृष्ण आयोग लागू केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर कधी काम करणार ?

You might also like