‘या’ मुद्द्यावर एबी डिविलियर्सला मिळाली युवराज आणि कोहलीची ‘साथ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या संघ निवडीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता माजी खेळाडू एबी डिविलियर्स याने भाष्य केले आहे. त्याचबरोबर त्याने या विषयावर आपली मते व्यक्त केली आहेत.

https://www.instagram.com/p/Bzz81FmAyDT/?utm_source=ig_web_copy_link

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आपल्याविषयी ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचे खंडन करताना त्याने म्हटले कि, मी कधीही वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यासाठी क्रिकेट बोर्डाशी संपर्क केला नाही. मात्र त्याने हे सांगितलं कि, कर्णधार फाफ डु प्लेसीस याच्याशी झालेल्या खासगी बोलण्यात त्याने संघाला गरज असेल तेव्हा आपण उपलब्ध राहू असे म्हटले होते.

त्याचबरोबर त्याने फाफ डु प्लेसीस याला आपला स्कूल फ्रेंड म्हटले आहे. मात्र या खासगी गोष्टी मीडियात लीक झाल्याने त्याने दुःख व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत आपले दुःख व्यक्त केले. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज युवराज सिंग हे त्याच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी त्याचे समर्थन केले आहे.

virat jpg

विराट कोहली याने डिविलियर्सच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले कि, भावा मी वैयक्तिकरित्या ज्यांना चांगले ओळखतो त्यातील तू एक व्यक्ती आहेस. तू सर्वर प्रामाणीक आणि समर्पित व्यक्ती आहेस. तुला जी काही वागणूक देण्यात आली ते खरोखरच दुर्भाग्यपूतन आहे. मी तुझ्याबरोबर आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबियांना देव अधिक ताकद देवो. मी आणि अनुष्का नेहमी तुझ्या मागे उभे आहोत. यावर डि विलियर्सने प्रेमाची इमोजी टाकत विराट कोहलीला रिप्लाय दिला.

yuvi jpg

त्याचबरोबर युवराज सिंग याने देखील डिविलियर्सला पाठिंबा दर्शवत त्याच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले कि,माझ्या प्रिय मित्रा मी ज्या लोकांबरोबर क्रिकेट खेळलो त्यातील तू एक उत्तम आणि सर्वात चांगला माणूस आहेस. या स्पर्धेत तुझ्याशिवाय दक्षिण आफ्रिका जिंकणे शक्य नव्हते. संघात तुला न घेतल्यामुळे संघाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सगळ्यांना माहित आहे तू किती प्रामाणिक आणि जंटलमन आहेस.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’