हॉंगकॉंगमधून पळून अमेरिकेत पोहोचल्या वायरॉलॉजिस्ट, ‘साक्ष’ देताना म्हणाल्या – ‘चीननं कोरोनाला जगापासून लपवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूमुळे जगभरात १.२० कोटी लोकांना लागण झाली आहे आणि सहा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाविषयी जगापासून सत्य लपवल्याबाबत चीन पुन्हा एक्सपोज झाला आहे. हाँगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेत पोहोचलेल्या एका वैज्ञानिकाने खुलासा केला आहे की, जगाला सांगायच्या अगोदर चीनला कोरोना विषाणूबद्दल फार पूर्वी माहित होते. हे सरकारच्या उच्च स्तरावर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील वायरॉलॉजी आणि इम्यूनोलॉजी तज्ञ ली-मेंग यान यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत बोलताना अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी म्हटले की, महामारीच्या सुरूवातीस या संशोधनाकडे त्यांच्या पर्यवेक्षकांनी देखील दुर्लक्ष केले, जे या क्षेत्रातील जगातील अव्वल तज्ञ आहेत. त्यांचा विश्वास आहे की, यामुळे लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकत होते.

यान म्हणतात की, कोविड-१९ चा अभ्यास करणार्‍या जगातील पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी ती एक होती. त्या म्हणाल्या, “चीन सरकारने परदेशी आणि अगदी हाँगकाँग तज्ञांना संशोधनात समाविष्ट करण्यास नकार दिला.” यानने म्हटले की, लवकरच संपूर्ण चीनच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी या व्हायरस विषयी चर्चा केली, पण लवकरच त्याचा सूर बदलल्याचे लक्षात आले. व्हायरसवर उघडपणे चर्चा करणारे डॉक्टर आणि संशोधक अचानक शांत झाले. वुहानमधील डॉक्टर आणि संशोधक गप्प बसले आहेत आणि इतरांना तपशील विचारू नका असा इशारा दिला आहे.

यानच्या मते, डॉक्टर म्हणाले की आम्ही याबद्दल बोलू शकत नाही. पण मास्क घालण्याची गरज आहे. त्यांच्या सूत्रांनुसार, पुन्हा मानवाकडून मानवांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढू लागला. यानंतर यानने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. बॅग पॅक केली आणि कॅम्पसमधील कॅमेरे आणि सेन्सरपासून बचाव करत २८ एप्रिल रोजी अमेरिकेसाठी कॅथी पॅसिफिक येथे उड्डाण केले.

त्यांच्याकडे फक्त पासपोर्ट आणि पर्स होती, बाकी सर्व काही सोडावे लागले. जर त्या पकडल्या गेल्या असत्या, तर त्यांना तुरूंगात टाकले असते किंवा गायब केले असते. यानने म्हटले की, चीन सरकार त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारचे गुंड त्यांना शांत करण्यासाठी सायबर हल्ले करत आहेत.

यानने माध्यमांना सांगितले की, गावी असलेल्या तिच्या छोट्या अपार्टमेंटला हाँगकाँग सरकारने तोडले आणि तिच्या पालकांची चौकशी केली. त्या म्हणतात की, आताही त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना अशीही भीती वाटत आहे की, त्या कधीही आपल्या घरी जाऊ शकणार नाही आणि त्यांच्या मित्र व कुटूंबाला भेटू शकणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like