Credit Card वरून ‘ऑनलाइन’ खरेदीच्या व्यवहारांना करा ‘सेफ’, काही मिनीटांमध्ये स्वतः ‘जनरेट’ करा ‘व्हर्चुअल’ क्रेडिट कार्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही वर्षापासून ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. परंतु त्यात ऑनलाइन फसवणूकीची शक्यता आहे. ग्राहक ऑनलाइन खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. सायबर हॅकर याचाच फायदा घेऊन बँकेतून पैसे काही मिनिटात लंपास करतात. परंतु आता यावर उपाय म्हणून ऑनलाइन खरेदी करताना व्हर्चुअल डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फसवणूकीचा धोका टाळला जातो.

ऑनलाइन बँकिंगकडून व्हर्चुअल कार्ड बनवावे –
व्हर्चुअल क्रेडिट कार्ड एक इलेक्ट्रॉनिक कार्ड असते. हे बँक किंवा ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. ऑनलाइन बँकिंगवर लॉगइन केल्यावर तुम्हाला एक टॅब दिसेल, ज्यात व्हर्चुअल क्रेडिट आणि डेबिट कार्डचा पर्याय असतो. यासाठी बँकेकडून वेगळ्या प्रकारे कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. व्हर्चुअल कार्ड तयार केल्यावर तुम्हाला एक जनरेट होणारा नंबर मिळेल ज्याचा वापर काही कालावधीसाठीच व्यवहारादरम्यान करता येईल. यामुळे ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना त्यांचा खरा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर द्यावा लागणार नाही.

कोण वापरु शकतात –
जर तुम्ही कोणतेही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापर असाल तर काही मिनिटात एक व्हर्चुअल क्रेडिट कार्ड ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून जनरेट करु शकतात. व्हर्चुअल क्रेडिट कार्ड त्यांच्यासाठी देखील उपल्बध आहे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही. अशा वेळी व्हर्चुअल क्रेडिट कार्डला डेबिट किंवा बँक खात्याशी जोडता येते.

असे आहे सुरक्षित –
व्हर्चुअल कार्ड एका मर्यादित कालावधीसाठी सक्रिय होतो आणि याचा वापर फक्त एकाच वेळी केला जाऊ शकतो. बँक शक्यतो एक व्हर्चुअल क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक वन टाइम पासवर्ड पाठवते. हे तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डच्या वेंडरला थेट देण्यात येणारी जोखिम कमी होते. यामुळे हे कार्ड एका सामान्य कार्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे.

48 तास वैध असते व्हर्चुअल कार्ड –
वर्चुअल कार्डचा वापर तुम्ही सामान्य कार्ड प्रमाणे ऑनलाइन खरेदीसाठी करु शकतात. यात कार्डमध्ये तुम्हाला व्हर्चुअल कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर आणि वैधता मिळेल. शक्यतो एका व्हर्चुअल कार्डची किमान व्यवहाराची सीमा 100 रुपये ते 50 हजार रुपये असते, याची वैधता 24 तास ते 48 तासाच्या दरम्यान असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/