चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   7 Foods You Should Never Reheat : वेळ वाचवण्यासाठी आणि भूख शांत करण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे अन्न गरम करून खात असाल तर तुमची ही सवय तोबडतोब बंद करा. ही सवय आरोग्याचे नकळत मोठे नुकसान करू शकते. फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा गरम खाण्यासाठी सर्वच पदार्थ योग्य नसतात. काही पदार्थ असे केल्याने अनेक धोके निर्माण करू शकतात. कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नयेत ते जाणून घेवूयात…

चिकन –

शिळे चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यामधील प्रोटीन नष्ट होतात. पचनाशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.

अंडे –

अंडे दुसर्‍यांदा उच्च तापमानावर गरम केल्याने विषारी होते. विशेष करून उकडलेले अंडे पुन्हा गरम करून खाऊ नये. यामुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. कॅन्सरसारखा घातक रोग सुद्धा होऊ शकतो.

भात –

फूड्स स्टँडर्ड्स एजन्सी (एफएसए) नुसार, शिळा भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने व्यक्ती फूड पॉयजनिंगने पीडित होऊ शकतो. भातात बॅसिलस सेरेस नावाचे अत्यधिक प्रतिरोधक बॅक्टेरिया असतात. तांदूळ शिजवताना ते नष्ट होतात, परंतु भात थंड झाल्यानंतर ते पुन्हा वाढतात. अशावेळी पुन्हा गरम केल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.

बटाट्याची भाजी –

बटाट्याची भाजी सतत गरम केल्याने यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे पचनशक्ती बिघडते.

मशरूम –

मशरूम बनवल्यानंतर तोबडतोब खावेत दुसर्‍या दिवसासाठी ठेवू नये. हे पुन्हा गरम केल्यावर यात विषारी पदार्थ तयार होतात. पचनशक्ती बिघडते.

पालक –

यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते, हे पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास नायट्राईट हे नायट्रोजमीन्स मध्ये बदलते, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

बीट –

बीट सुद्धा पुन्हा गरम केल्यास यातील नायट्रेट नष्ट होऊ लागते.