लय भारी ! WhatsApp मध्ये आले नवीन फिचर, नको असलेल्या चॅट्सनं होणार नाही त्रस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पॉप्युलर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सचा चॅट एक्सप्रिएन्स पहिल्यापेक्षा चांगला बनवण्यासाठी नव-नवीन फिचर आणत असते. अशाच प्रकारे कंपनीने आता एक खास अपडेट आणले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कॉन्टॅक्ट्सचे चॅट लपवू शकता, जे त्रास देतात. सध्या कंपनी यूजर्सला आर्काइव्ह चॅट्सचे ऑपशन देते, परंतु यामुळे चॅट्स नेहमीसाठी हाईड होत नाही.

चॅट्स ब्लॉक करण्याची आवश्यकता नाही

आर्काइव्ह करण्यात आलेले चॅट्स यूजरच्या चॅट लिस्टमध्ये सर्वात खाली जातात, परंतु नवीन मेसेज येताच ते चॅट पुन्हा टॉपवर दिसू लागते. मात्र, आता व्हॉट्सअप जे नवीन फिचर आणत आहे, त्याच्या मदतीने नको असलेल्या कॉन्टॅक्टच्या चॅट्सपासून सुटका मिळेल. विशेष बाब ही आहे की, यासाठी तुम्हाला त्या कॉन्टॅक्टला ब्लॉक करण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही.

बीटा व्हर्जनमध्ये केले जात आहे रोलआऊट

डब्ल्यूए बीटा इन्फोच्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअपने आता इरिटेटिंग चॅट्सला चॅट लिस्टमध्ये लपवण्याचे फिचर रोलआऊट करणे सुरू केले आहे. कंपनीच्या या फिचरची खास बाब ही आहे की, आता आर्काइव्ह करण्यात आलेले चॅट नवीन मेसेज आल्यानंतर सुद्धा चॅट लिस्टमध्ये हिडन म्हणजे लपलेले राहिल. नवीन फिचरचे नाव न्यू आर्चिव्ह आहे हे अ‍ॅड्रॉईडसाठी व्हॉट्सअप बीटा व्हर्जन नंबर 2.21.11.1 च्यासोबत रोलआऊट केले जात आहे.

लवकरच रिलिज होऊ शकते स्टेबल व्हर्जन

जर तुम्ही व्हॉट्सअप बीटा टेस्टर आहात, तर तुम्ही हे फिचर सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट्स ऑपशनमध्ये दिलेल्या किप चॅट्स आर्चिव्हवर टॅप करून अ‍ॅक्सेस करू शकता. हे ऑपशन ऑन केल्यानंतर नको असलेले चॅट आर्काइव्ह आणि म्यूट होतील आणि नवीन मेसेज आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येणार नाही. कंपनी या फिचरची बीटा टेस्टिंग करत आहे आणि अपेक्षा आहे की लवकरच स्टेबल वर्जनसुद्धा रोलआऊट केले जाईल.