जेव्हा बॅट्समन सहकारी खेळाडूला OUT करण्यासाठी करतो बॉलरला मदत (व्हिडीओ)

मुंबई : पोलीलनामा ऑनलाइन – क्रिकेटच्या खेळात एक फलंदाज बाद होण्याचे अनेक प्रकार तुम्ही बघितले असतील. अनेकदा दोन किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंच्या जुगलबंदीमुळे मनोरंजक प्रयत्न पाहायला मिळतात. तर काही वेळा हे प्रयत्न असे असतात, ज्यामुळे तुम्ही पोट धरून हसू शकता. पण तुम्ही कधी असे पाहिले आहे किंवा ऐकले आहे, ज्यामध्ये एका फलंदाजाला आऊट करण्यासाठी दुसर्‍या फलंदाजाने गोलंदाजाला मदत केली आहे. फॉक्स क्रिकेटने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा मनोरंजक व्हिडिओ शेयर केला आहे. निश्तिच तुम्ही एखादा फलंदाज अशापद्धतीने आऊट होताना पाहिले नसेल.

यामध्ये गोलंदाजाच्या चेंडूवर फलंदाज फटका मारतो, परंतु चेंडू बॅटला लागत नाही आणि हुकतो. यादरम्यान नॉन स्ट्राइक एंडवर उभा असलेला दुसरा फलंदाज ताबडतोब धाव काढण्यासाठी धावतो. पहिला फलंदाज हे पाहात नाही आणि चेंडू पटकन गोलंदाजाकडे फेकतो.

गोलंदाज येथे फलंदाजाला धावबाद करण्यात अजिबात उशीर करत नाही. यादरम्यान यष्टीरक्षक आणि फलंदाजाचा चेहरा बघण्यासारखा होतो. कारण दोघे हे सर्व पाहून हसू लागतात. परंतु, ही कोणतीही अंतरराष्ट्रीय मॅच नव्हती.