कोण आहे पाकिस्तानच्या इशार्‍यावर NSA अजीत डोभाल यांची रेकी करणारा जैशचा दशहतवादी मलिक, जाणून घ्या पूर्ण ‘कुंडली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान येथील दहशतवादी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. या गोष्टीचा खुलासा स्वत: जैश-ए-मोहम्मदच्या दशहतवाद्याने केला आहे. अजीत डोभाल यांना निशाणा बनवण्याच्या उद्देशाने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हिदायत उल्लाह-मलिकने त्यांचे कार्यालय आणि दिल्लीतील काही ठिकाणांची रेकी केली आहे आणि याचा व्हिडिओ सीमेपलिकडील आपल्या हँडलरला पाठवला आहे. याचा खुलासा झाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. हिदायत उल्लाह-मलिक हा जैशचीच एक संघटना लश्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख आहे.

जैशचा दहशतवादी मलिक जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये राहणारा आहे. 6 फेब्रुवारीला जैश ऑपरेटर मलिकला पोलिसांनी अटक केली होती. मलिकविरूद्ध जम्मूच्या गंग्याल पोलीस ठाण्यात कलम 18 आणि 20 यूएपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याचा एफआयआर नंबर- 15/2021 आहे. मलिक जैश फ्रंट गटाच्या लश्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख आहे. पोलिसांनी जेव्हा दहशतवादी मलिकला अनंतनागमध्ये पकडले होते, तेव्ह त्याच्याकडून शस्त्र आणि दारूगोळा जप्त केला होता.

हिंदूस्तान टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत मलिकने पोलिसांसमोर चौकशीदरम्यान सांगितले की, 24 मे 2019 ला तो एनएसए यांच्या कार्यालयासह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) सुरक्षा विस्ताराचा एक गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी इंडिगोच्या फ्लाइटने श्रीनगरहून नवी दिल्लीला गेला होता. त्याने एनएसएच्या कार्यालयाची रेकी केल्यानंतर ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाकिस्तानातील हँडलरला फॉरवर्ड केले होते. दिल्लीत रेकी करणे आणि व्हिडिओ पाकिस्तानात पाठवल्यानंतर मलिक बसमध्ये बसून पुन्हा काश्मीरला परतला.

मलिकच्या काळ्या कुंडलीची काही पाने ऊजनही आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यादरम्यान सुद्धा त्याने रेकी केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या चौकशीत त्याने मान्य केले की, त्याने दहशतवादी समीर अहमद डारच्या सोबत 2019 मध्ये उन्हाळ्यात सांबा सेक्टर सीमाक्षेत्राची रेकी केली होती. अहमद डार तोच आहे ज्यास 21 जानेवारी 2020 ला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपात अटक केली होती.

दहशतवादी मलिकने मे 2020 मध्ये काश्मीरमध्ये एका आत्मघाती हल्ल्यासाठी एक हुंदाई सँट्रो कार दिली होती आणि त्याने मान्य केले की, आणखी तीन जैश दहशतवादी – इरफान ठोकर, उमर मुश्ताक आणि रईस मुस्तफा- यांनी शोपियांमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाख रुपये लूटले होते. याशिवाय, दहशतवादी मलिकने जैश ऑपरेटर आशिक अहमद नगरू यास डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 च्या दरम्यान सांबा सेक्टरच्या माध्यमातून भारतातून पळून जाण्यास मदत केली होती.

मलिक 31 जुलै 2019 ला हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये जैशमध्ये येण्यापूर्वी जैशसाठी ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून काम केले आणि नंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये एक वेगळा दहशतवादी फ्रंट ग्रुप स्थापन केला. 6 फेब्रुवारीला अटकेच्या दरम्यान पोलीसांच्या समोर त्याने हे सुद्धा सांगितले की, जम्मू शहरात तो एक मोठा दशहतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सुद्धा तो आरोपी आहे.