पत्नी पोलिसात आणि पती चोरू लागला लग्झरी गाड्या, 500 पेक्षा जास्त कार चोरल्याचा झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मणिपुर पोलीसमध्ये कार्यरत एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा कार चोर पती मोहम्मद हबीबुर रहमानला उत्तर दिल्ली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडे दिल्लीतून चोरलेल्या 10 लग्झरी कारसुद्धा जप्त केल्या आहेत. आरोपी मोहम्मद हबीबुर रहमानची अटक त्याच्या गँगचा सदस्य राजीवच्या माहितीवरून झाली आहे.

पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, 2 जुलैला शक्ती नगर परिसरात एक लग्झरी कार चोरीस गेली होती. स्थानिक पोलीसांसह प्रकरणाचा तपास स्पेशल स्टाफचे इन्स्पेक्टर सुनील शर्मा यांच्या पथकाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस टीमने एक आरोपी राजीवला ओळखले. 18 जुलैला पोलीस टीमने राजीवला चंदगीराम अखाड्याजवळून ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीत आपल्या गँगबाबत सर्व सांगितले, ज्यानंतर पोलिसांनी मोहम्मद हबीबुर रहमान आणि सागर रॉय यांना पकडले.

ऑर्डरनुसर करत होते चोरी
पोलीस चौकशीत समोर आले की, मोहम्मद हबीबुर रहमान मणिपुरचा राहणारा आहे आणि त्याची पत्नी मणिपुर पोलीसमध्ये कॉन्स्टेबल आहे. हबीबुर रहमानसुद्धा मणिपुर व्हिलेज डिफेन्स फोर्ससाठी काम करत होता, परंतु लवकर पैसा कमावण्यासाठी तो वाहन चोर बनला, आणि आग्राच्या राजीव आणि कोलकाताच्या सागर रॉयसोबत मिळून दिल्ली-एनसीआरमधून लग्झरी गाड्या चोरी करून ते विकू लागले. आरोपींनी सांगितले की, ते केवळ ऑर्डरनुसार गाडी चोरत असत.

विमानाने येत होते चोरी करण्यासाठी
आरोपी विमानाने गाडी चोरी करण्यासाठी येत असत आणि गाडी चोरून पुन्हा विमानाने जात असत. आरोपींनी चौकशीत सांगितले की, त्यांनी आतापर्यंत सुमारे 500 गाड्या चोरून उत्तर-पूर्व राज्यांमध्ये विकल्या आहेत.