Coronavirus : राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चं थैमान, संक्रमित रुग्णांची संख्या 90 हजाराच्या टप्प्यात

दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्लीत कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे प्रकरणं 90 हजाराच्या जवळ पोहचले आहेत. तर कोरोना विषाणूमुळे राजधानी दिल्लीमध्ये मृतांची संख्या 2803 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीमध्ये 2442 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यानंतर दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 89 हजार 902 इतकी झाली आहे.

आरोग्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 89 हजार 902 इतकी झाली असून 59 हजार 992 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय दिल्लीमध्ये 27007 अ‍ॅक्टिव रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज कोरोनामुळे 61 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 2803 इतकी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचे एकूण 15 हजार 242 बेड्स आहेत. यामध्ये 9 हजार 350 शिल्लक आहेत. दुसरीकडे कोरोना केअर सेंटरमध्ये 6124 बेड्स आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये 319 बेड्स रिकामे आहेत. सध्या राजधानी दिल्लीमध्ये 16703 कोरोना बाधित रुग्ण होम कॉरंटाईनमध्ये असून त्यांच्यावर घरामध्ये उपचार सुरु आहेत.