पासवर्ड सुरक्षित ठेवायचाय ? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याचा जमाना हा डिजिटल जमाना आहे पण या डिजिटल जमान्यात तुमचे ऑनलाईन बँक अकाऊंट , सोशल मिडिया अकाऊंटस यांचे पासवर्ड हॅक केले जाऊन गोपनिय माहितीच्या आधारे गैरवापर केले गेल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे तुमचा पासवर्ड सुरक्षित असणे खूप महत्वाचे आहे. तेव्हा तुमचा पासवर्ड सुरक्षित कसा ठेवावा यासाठीच काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

खासगी माहिती पासवर्डच्या रूपात ठेऊ नाका : अनेकदा पासवर्ड म्हणून खासगी माहिती ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. म्हणजेच तुमचे नाव , वाढदिवस , मुलाचे नाव इ. अशा प्रकारचे पासवर्ड हे जगात सर्वाधिक लोक ठेवतात मात्र हे पासवर्ड ओळखणे हॅकर करिता सहज शक्य होते. त्यामुळे तुमचा पासवर्ड हॅक होण्याचा धोका अधिक असतो.

 “१२३४५” असे आकडे टाळा : युकेमधल्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’च्या अहवालानुसार जगात कोट्यवधी लोकांचा पासवर्ड हा “१२३४५” आणि “qwerty” असा आहे. हा पासवर्ड इतका सोपा आहे की कोणीही तो सहज ओळखून एखाद्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरफायदा घेऊ शकतो असंही ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’नं सांगितलं आहे. त्यामुळे हा आकडा पासवर्डमध्ये ठेवणं टाळा.

युनिक पासवर्ड तयार करा : पासवर्ड तयार करताना त्यात कॅपिटल, स्मॉल लेटर्स, अंक आणि काही स्पेशल कॅरेक्टर्स यांचं कॉम्बेनेशन ठेवा. या कॉम्बेनेशनमधला पासवर्ड हॅक होणं सहज शक्य नाही.

मल्टी ऑथेन्टीकेशन फॅक्टर : हा तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की कामी येईल. यामध्ये तुमच्या फोन क्रमांकावर एक कोड येतो या कोडशिवाय तुमचं अकाऊंट ओपन होऊ शकत नाही.

पासवर्ड मॅनेजर : पासवर्ड अनेकांच्या लक्षात राहत नाही. अशावेळी पासवर्ड मॅनेजर हा पर्यायही तुम्ही वापरू शकता. अनेक स्मार्टफोन कंपन्यांचे वेगळे पासवर्ड मॅनेजर आहेत तुमच्या फोन कंपनीप्रमाणे तुम्ही ते वापरून पाहू शकता.