‘क्रेजी’ लाईटनिंगमध्ये MS धोनीनं लाडक्या ‘जीवा’सोबत घेतला बाईक रायडींगचा आनंद ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रांचीतील फार्म हाऊसवर फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत आहे. धोनीची पत्नी साक्षीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात धोनीची मुलगी जीवा बाईक सवारी करताना दिसत आहे.

साक्षीनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की धोनीनं जीवाला बाईकवर बसवलं आहे आणि तिला चक्कर मारत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रांचीत वादळी वातावरण झालं आहे. धोनी रांचीतील फार्म हाऊसवल टेहाळणी करताना दिसत आहे. मुलीसोबत त्यानं बाईक राईडचा आनंद घेतला आहे.

सध्या धोनी आणि जीवाचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

धोनीला बाईकचं किती वेड आहे हे त्याच्या चाहत्यांनाही माहित आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवरच त्यानं बाईक रायडिंगचा आनंद घेतला आहे. याआधीही जीवाचे असे राईडिंग करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like