‘उबर ईट्स’कडून खाद्यपदार्थ मागणार्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘झोमॅटो’नं पहाटे 3 वाजता केलं ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता भारतात उबेर इट्सनं जेवण ऑर्डर करता येणार नाही. परंतु तुम्ही तुमचं आवडतं जेवण झोमॅटोद्वारे मागवू शकता. झोमॅटोनं उबेर इट्स विकत घेतलं आहे. पीटीआयनुसार, मगंळवारी झोमॅटोनं म्हटलं की, “केवळ 9.9 टक्के शेअर्सच उबेर इट्सकडे असणार आहे.” कॅब सर्व्हीस देणारी कंपनी उबेरची जेवण डिलिव्हर करणारी शाखा उबेर इट्स काही खास करताना दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 3 वाजता ही डील साईन झाली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून उबेर इट्सचे ग्राहक झोमॅटो अ‍ॅपवर शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे.

झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले, “आम्हाला भारतात 500 हून अधिक शहरात ऑनलाईन फूड डिलिव्हर करणारा व्यवसाय बनवण्यावर गर्व आहे. आता उबेर इट्स विकत घेतल्यामुळे आमची स्थिती मजबूत बनेल. नंतर उबेर इट्सच्या 41 शहरात 26000 हून अधिक रेस्टॉरंट आहेत. उबेरनं 2017 मध्ये भारतात कामाला सुरुवात केली होती.

झोमॅटो आणि उबेर इट्समध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बातचित सुरू होती. झोमॅटो आणि स्विगीच्या टफ कॉम्पिटीशनमध्ये उबेर इट्सला नुकसानीचा सामना करावा लागला आहे. उबेरचे सीईओ दारा खोसरोशाही म्हणाले, “उबेरसाठी भारत ही एक महत्त्वा्ची बाजारपेठ आहे. आम्ही आमच्या कॅब सर्व्हीसमध्ये गुंतवणूक करणं सुरूच ठेवणार आहोत. चांगले भांडवल आणि व्यवसायाच्या व्यवस्थापून झोमॅटोच्या वेगवान हालचालींमुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. त्यांना यश मिळेल अशी आशा आहे.”

असं म्हटलं जात आहे की, उबेरची एक पॉलिसी आहे. ते जर पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर नसतील तर ते बाजारपेठ सोडतात. त्यामुळे आपल्या धोरणांना धरून हा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, हे विलनीकरण केवळ भारतात उबेर इट्ससाठी आहे. इतर देशात उबेर इट्स आपल्या सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीनं असंही म्हटलं आहे की, हा करार केवळ उबेर इट्ससाठी आहे. उबेर कॅब्ससाठी नाही.

फेसबुक पेज लाईक करा –