महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वे पोलिसाचे अजब उत्तर, म्हणाले – ‘आधीच मनुष्यबळ कमी, सगळीकडं कस लक्ष देणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईत तीन दिवसापूर्वी मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना घडली त्यावेळी महिला डब्यात पोलिसाची उपस्थिती नव्हती. मात्र यावर स्पष्टीकरण देताना रेल्वे पोलिसांनी अजब (Strange) उत्तर दिले आहे. महिला प्रवासी डब्यांमध्ये रात्री 9 नंतरच पोलिस असतात. तसेच मनुष्यबळ कमी असताता सगळीकड कस लक्ष देणार असे अजब (Strange) वक्तव्य पोलिसांनी केले आहे.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. संध्याकाळी 6 नंतर महिलांच्या डब्यात GRP/RPF जवान असणे बंधनकारक असताना ते का उपस्थित नव्हते? याची चौकशी होणे गरजेच आहे.

गृहिणी आणि घरकामगार महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याचे महापौरांचे आवाहन; महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आरोग्य किट चे वाटप – हर्षदा फरांदे

यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. विद्या पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

कळवा रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.29) रात्री एका मोबाईल चोरट्याने महिला प्रवासी डब्यात शिरून विद्या पाटील यांचा हातातील मोबाईल हिसकावला.

त्यावेळी चोराबरोबर झटापट करताना विद्या यांचा तोल गेला अन् त्या रेल्वेखाली पडल्या.

राज-उद्धव एकत्र येतील काय? राज यांचे अवघ्या 2 शब्दात मार्मिक उत्तर, म्हणाले….

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जर महिला डब्यामध्ये पोलिसांची उपस्थिती असती तर ही घटना टळली असती. पण डब्यात कोणीही उपस्थित नव्हते. खरे तर सायंकाळी महिलांच्या डब्यात पोलिस असणे बंधनकारक आहे. पण तरीही पोलिस नव्हते.

Aadhaar Card वर असलेल्या फोटोनं तुम्ही ‘समाधानी’ नाही का? मग आजच बदला, खुपच सोपीय प्रोसेस, जाणून घ्या

याबाबत रेल्वे पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी अजब उत्तर दिले आहे. महिला प्रवासी डब्यांमध्ये रात्री 9 नंतरच पोलिस असतात. तसेच ज्यावेळी ही घटना घडली ती वेळ शिफ्ट बदलीची असते.

त्याशिवाय कमी मनुष्यबळ असल्याने रेल्वे फलाटावर पोलिस कमी असतात असे अजब विधान ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक एन.जी.खडकीकर यांनी केले आहे.

फायद्याची गोष्ट ! फक्त 5 हजार गुंतवून 50 हजार कमवण्याची संधी ! सुरू करा ‘हा’ बिझनेस, मोदी सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! बॅंकेने कामकाजाच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या