खळबळजनक ! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह इमारतीवरून मारली उडी

गाझियाबाद : वृत्तसंस्था – पती आणि त्याच्या दोन पत्नींनी संशयास्पद परिस्थितीत अपार्टमेंटमधून उड्या मारल्या. ही घटना गाझियाबादच्या इंदिरापुरमधील वैभव खंड अपार्टमेंटमध्ये घडली. त्यांनी अपार्टमेंटच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत पती आणि त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला तर एका पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. उडी मारण्यापूर्वी पती आणि दोन्ही पत्नींनी आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला.

घरगुती कलह आणि पैशांच्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संपूर्ण इंदिरापूरमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. यामध्ये कौटुंबिक वादातून झोपलेल्या अवस्थेत पत्नी, पाच वर्षाचा मुलगा आणि दोन जुळ्या मुलींवर पतीने चाकूने सपासप वार करून खून केला होता. यानंतर पती हा फ्लॅट बंद करून पळून गेला. आरोपी सुमित पत्नी अंशु बाला, 5 वर्षाचा मुलगा परमेश आणि दोन जुळ्या मुलांसह रहात होता. दुपारी तीनच्या सुमारास सुमितने पत्नी आपल्या मुलांचा खून करून पळून गेला.

वैभव खंडमधील या खळबळजनक घटेनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. अपार्टमेंटच्या गार्डने या घटनेबबात पोलिसांना माहिती दिली. वैभव खंडच्या कृष्णा निलम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तिघांनी उडी मारली होती. पोलीस घटनास्थळी पोहचले असता दोन महिला आणि एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.