Strawberry Moon 2021 | 24 जूनला आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून, जाणून घ्या या अनोख्या खगोलीय घटनेबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – यावर्षी 24 जूनला ग्रीष्म संक्रातीनंतर पहिली पौर्णिमा आहे आणि या दिवशी एक अनोखी खगोलीय घटना आकाशात दिसणार आहे. 24 जूनरोजी आकाशात चंद्र स्ट्रॉबेरीच्या रंगात रंगलेला दिसेल. या अनोख्या खगोलीय घटनेला स्ट्रॉबेरी मून (Strawberry Moon 2021) म्हटले जाते.

या दिवशी चंद्र आकाराने मोठा आणि थोडा-थोडा स्ट्रॉबेरीप्रमाणे गुलाबी रंगाचा दिसेल. जूनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी उगवणार्‍या या चंद्राला स्ट्रॉबेरी मून (Strawberry Moon) म्हणतात. काही-काही ठिकाणी यास हॉट मून (Hot Moon) किंवा हनी मून (Honey Moon) सुद्धा म्हटले जाते.

काय असणार विशेष?
चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीच्या जवळ असल्याने आपल्या सामन्य आकारापेक्षा खुप मोठा दिसेल. यावेळी त्यास स्ट्रॉबेरी म्हटले जाते.

कसे पडले स्ट्रॉबेरी मून नाव?
स्ट्रॉबेरी मूनचे नाव प्राचीन अमेरिकन जनजातींकडून मिळाले आहे, ज्यांनी स्ट्रॉबेरी कापणीच्या हंगामाला सुरुवात करण्यासाठी पौर्णिमेची खूण ठरवली होती. स्ट्रॉबेरी मून एक स्थानिक अमेरिकन नाव आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात यास वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

युरोपमध्ये म्हणतात रोज मून
युरोपमध्ये स्ट्रॉबेरी मूनला रोज मून म्हटले जाते.
जो गुलाबाच्या कापणीचे प्रतिक आहे.
उत्तर गोलार्धात यास उष्ण चंद्र (Hot Moon) म्हटले जाते कारण हा भूमध्य रेषेच्या उत्तरेला उन्हाळ्याच्या हंगामाची सुरूवात करतो.
यास तेथील उन्हाळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते.

जगभरात आहेत इतकी नावे
स्ट्रॉबेरी मून सामन्यपणे वसंत ऋतूमधील अखेरची पौर्णिमा किंवा उन्हाळ्याच्या पहिल्या तारखेला दिसतो.
यास ब्लूमिंग मून, ग्रीन कॉर्न मून, होर मून, बर्थ मून, अंडी देणारा चंद्र आणि हॅचिंग मून, हनी मून आणि मीड मून सुद्धा म्हटले जाते.

हिंदू पंचांगात काय म्हणतात…
स्ट्रॉबेरी मून एका रात्रीपेक्षा जास्त वेळ दिसणार आहे.
हिंदू पंचांगानुसार स्ट्रॉबेरी मून वसंत ऋतूची शेवटची पौर्णिमा आणि ग्रीष्म ऋतुच्या पहिल्या पौर्णिमेचे प्रतिक आहे.
स्ट्रॉबेरी मूननंतर 24 जुलैला बक मून आणि 22 ऑगस्टला स्टर्जजन मून दिसणार आहे.

Web Title :- Strawberry Moon 2021 | strawberry moon on june 24 the last super moon of 2021

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर