काय सांगता ! IIT पवईच्या वर्गात घुसली गाय (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशलमिडीयावर एका गायीचा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओतील गाय एका महाविद्यालयातील वर्गात चालत असल्याचे दिसून येत आहे. अधिक माहिती घेतली असता, ही गाय आयआयटी पवईच्या कॅम्पसमध्ये घुसल्याचे समोर आलं आहे. एवढेच नव्हे तर या गाईने थेट विद्यार्थ्यांच्या वर्ग खोलीत प्रवेश मिळवला आहे. वर्गात लेक्चर सुरु असतानाच गायीने वर्गात एंट्री मारल्याने एकच गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी मेहनत घेतात, त्या ठिकाणी या गायीला सहज प्रवेश मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, वर्गात घुसलेल्या या गायीला वर्गातील शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी बाहेर काढत आहेत. वर्गातील काही विद्यार्थ्यांना या गाईचा व्हिडीओ काढला. सोशलमिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओचा संदर्भ देत विनोद करत आहेत.

https://twitter.com/DesiPoliticks/status/1155476197863768064

बैलाला पकडण्यास केला होता विरोध
काही दिवसांपूर्वी याच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याला बैलाने उचलून फेकल्याची घटना घडल्यानंतर मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच विरोध केला होता. मोकाट फिरणाऱ्या बैलांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी गाडी घेऊन आल्याचं समजताच तिथे प्राणिमित्र रहिवासी आणि आयआयटीचे विद्यार्थी जमले व त्यांनी बैलाला पकडण्यास विरोध केला. या नाट्यामुळे सकाळी या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था !

देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम असल्याचे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले आहे. जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ने प्रकाशित केली आहेत. त्या क्रमवारीत आयआयटी मुंबई १५२ व्या स्थानी, आयआयटी दिल्ली १८२ व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ १८४ व्या स्थानी आहे. २३ भारतीय संस्थांपैकी चार संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले आहे. सात संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –