नोरा फतेहीच्या ‘गरमी’ गाण्यामुळं झालं सोशलचं वातावरण ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार बेली डान्सचा जलवा दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेहीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तिने चाहत्यांना बेली डान्सने घायाळ केले आहे. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटातील ‘हाय गरमी’ हे गाणे..

नोरा आणि वरुण धवन यांचे ‘हाय गरमी’ हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याने अल्पवधीतच लोकांच्या मनात घर केले आहे. यांच्या या गाण्याला युट्यूबवर 10 कोटी 88 हजार व्हूज मिळाले आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे.

नोराने ‘ओ साकी साकी’ आणि ‘दिलबर’ यासारख्या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. त्याचबरोबर तिने 2014 मध्ये ‘रोअरः टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यानंतर तिने ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही काम केले आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकला नाही.

मोरक्कन-कॅनडियन अभिनेत्री नोरा दक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम सॉंग्समुळे प्रकाशझोतात आली आहे. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक 2’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयमट सॉंग चांगलेच गाजले होते. तिच्या बेली डान्सच्या कौशल्यामुळे तिने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. करिअरच्या सुरुवातीलाच या बेली डान्समुळे कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचे ती अभिमानाने सांगत असते.