#VIDEO : स्ट्रीट फुडच्या चाहत्यांनो हा धक्कादायक व्हिडीओ पहाच ! बोरिवलीतील इडलीवाला वापरतो चक्क टॉयलेटमधील पाणी

बोरिवली : पोलीसनामा ऑनलाईन – धकाधकीच्या जीवनात अनेकजण रस्त्यांवर स्ट्रीट फुड खाऊन आपली भूक भागवतात. परंतु अशाच स्ट्रीट फुड खाणाऱ्यांना धक्का बसेल असा एक प्रकार समोर आला आहे. बोरिवलीतील एका इडलीवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. हा इडलीवाला चक्क टॉयलेटमधील पाणी वापरतो. त्याला विचारणा केल्यावर तो हे टॉयलेट नाही असं म्हणतोय. त्यामुळे खरं काय ते तुम्हीच व्हिडीओत पहा

सुरज उपाध्याय नावाच्या एका फेसबुक युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत बोरिवलतील एक इडली वडा विकणारा चटणीसाठी चक्क टॉयलेटमधलं पाणी वापरताना दिसतो आहे. तो व्हीडीओमध्ये चक्क कॅनमध्ये टॉयलेटमधून पाणी भरून आणताना दिसतो आहे. त्यानंतर तेच पाणी तो वापरत असल्याचं दिसतंय. त्याला विचारणा केल्यावर मात्र तो हे टॉयलेट नसल्याचं म्हणतो आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या सगळ्या प्रकरणाची एफडीए (अन्न व औषध प्रशासनाने घेतली आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याचं एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रस्त्यावर ठेला लावणारा हा इडलीवाला नेमंक आणखी काय करतो? आणखी ठेलेवाले काय करतात याची चौकशी सुरु असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश आढव यांनी सांगितले.