रांजणगाव पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

शिक्रापुर : प्रतिनिधी( सचिन धुमाळ)  –  शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांसाठी ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीसांनी ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने व व्यायाम केलाच पाहिजे व स्वतःच्या शरीरासाठी दिवसातला काही वेळ दिलाच पाहिजे तरच शरीराचे व मनाचे व्यवस्थापन योग्य होईल असे प्रतिपादन शिवाजी कुचे यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे पोलीसांसाठी विविध विषयांवर आयोजन कार्यशाळेत व्यक्त केले .

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॕ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी कुचे, अमरावती यांचे रांजणगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या करिता ताण तणाव व्यवस्थापन , नकारत्मतेतून सकारात्मकतेकडे ,कोरोना फोबिया व योगा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेचा रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल कदम , सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक शुभांगी कुटे २१ पोलिस जवान,११ होमगार्ड, व पोलीस पाटील अशा एकूण सुमारे ४० ते ४५ कोव्हिड योद्ध्यांंनी लाभ घेतला