या कारणामुळे कमी होते संभोगाची इच्छा  

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – माणसाची काम इच्छा अचानकच कमी होते तेव्हा माणूस आपल्या जोडीदाराला सुखी ठेवू शकत नाही. काम इच्छा क्षीण होण्याची स्थिती मानवी जीवनात केव्हा येते? याचे उत्तर ती स्थिती कधीही आयुष्यात डोकावू शकते अगदी ऐन तारुण्यांच्या सकाळी  म्हणजे विशी पंचवीशीत सुद्धा अशी परिस्थिती तुमच्यावर उदभवू शकते. बदलत्या लाईफ स्टाईल मुळे हि समस्या आपल्या आयुष्यात कधीही डोकावण्याचा संभव असतो. त्यामुळे आपण सकस आहार, शरीराला व्ययामची सवय, पुरेशी झोप या सवयी अंगीकारल्यास आपण या समस्येला टाळू शकतो. संभोगाची इच्छा कमी करणाऱ्या  गोष्टी आता आपण पाहूया जेणे करून आपण या गोष्टी दूर ठेवून सुखी काम जीवनाचा लाभ घेऊ शकाल.

वाढता  तणाव
स्पर्धेच्या युगात वाढता तणाव  श्वासासारखा महत्वाचा झाला आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण मानत घेऊन जीवन जगत असतो. आर्थिक ताण ,कामाचा ताण , अभ्यासाचा ताण या ताण-तणावामुळे माणसाच्या मनावर खोलवर परिणाम होतात. त्यातूनच  तुमच्या काम जीवनात संभोगाची इच्छा मरण पावते अथवा कमी होते.

 अपुरी झोप
माणसाला झोपेची अत्यंत गरज असते माणसाने अपुरी झोप घेतली तर त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात त्याच प्रमाणे त्याच्या लैंगिक जीवनावर हि या अपुऱ्या झोपेचा परिणाम होऊ शकतो. म्हणून माणसाने ७ तासाची झोप घेणे महत्वाचे आहे असे डॉक्टर सांगतात. अपुरी झोप तुमच्या मनातील काम इच्छा मारू शकते म्हणून हि समस्या उदभवू नये यासाठी आपण आपल्या ७ तासाच्या झोपेवर बंधने लादू नका.

वाढते वजन 
माणसाचे वाढते वजन जसे अनेक विकारांना करणीभूत असते तसेच ते काम शक्ती कंकुवत करण्यास हि कारणीभूत असते. बॉडी मधील फॅट माणसाला संभोगाच्या वेळी हवी तशी हालचाल करू देत नाहीत म्हणून आपल्या मनाची काम तृप्ती होत नाही. हि स्थिती सतत राहिल्यास एके दिवशी तुमची काम इच्छा नाहीशी व्हायला सुरुवात होते.

उच्च रक्तदाब 
चांगले काम जीवन अनुभवायला लिंगामध्ये रक्त प्रवाह चांगल्या प्रतीचा होणे  गरजेचे असते जेणे करून लिंग चांगल्या पद्धतीने वर्धित होऊन सुखी काम जीवनाची अनुभूती अनुभवायला मिळेल म्हणून रक्त दाब असणाऱ्या व्यक्तीच्या गुप्तांगात असा उत्तर रक्त प्रवाह नैसर्गिक रित्या कमी प्रमाणात होतो. त्यामुळे तुम्ही सुखी संभोग करू शकत नाही. म्हणून तुम्हाला उच्च रक्त दाबाचा त्रास होत असेल तर यावर लवकरात लवकर इलाज करून घ्या.
संभोग हे मानवी जीवनाचे एक महत्वाचे साधन आहे. ज्याच्या शिवाय माणूस बेचन होतो आणि त्याचे परिणाम त्याच्या दैंनदिन जीवनावर होतात. म्हणून माणसाने उत्तम काम जीवनाची अनुभूती घेण्यासाठी वरील गोष्टींचा अवलंब आणि त्याज्य बाबी टाळल्या तर माणूस नक्कीच एक सुखी काम जीवन उपभोगू शकतो.