गरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – स्ट्रेच मार्क्स गरोदरपणातच होतात, असा समज सर्वश्रुत आहे. शिवाय स्ट्रेच मार्क हे फक्त महिलांनाच येतात असाही एक गैरसमज आहे. खरे तर स्ट्रेच मार्क महिलांना कधीही येऊ शकतात. तसेच पुरूषांना देखील स्ट्रेच मार्क येऊ शकतात. स्ट्रेच मार्क्स का येतात, कुणाला येऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

स्ट्रेच मार्क्स गरोदरपणानंतरच होतात हे चुकीचे आहे. ज्या लोकांचे वजन कमी असते त्यांना स्ट्रेच मार्क्स नसतात, असेही म्हटले जाते पण हे चूकीचे असून स्ट्रेच मार्कचा संबंध लठ्ठपणाशी नाही. अनेकदा सडपातळ लोकांनाही ही समस्या होऊ शकते. स्ट्रेच मार्क्स हार्मोनल व आनुवंशिक कारणांमुळे होतो. काही आजारांमध्येही याची शक्यता अधिक असते. स्ट्रेच मार्क्स केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होतात.

अनेकदा पुरुषांच्या त्वचेमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे हे मार्क्स होतात. अचानक वजन वाढणे किंवा घटणे याचे मोठे कारण आहे. हेच पुरुषांमध्ये जास्त दिसून येते. आहाराचा प्रभाव त्वचा आणि स्ट्रेच मार्क्स दोन्हीवर होतो. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेला आहार स्ट्रेच मार्क्सचा परिणाम कमी करण्यास मदत करतो. तसेच जे लोक पाणी कमी पितात त्यांच्या शरीरात स्ट्रेच मार्क्स वाढू शकतात. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट होऊन त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात.