आज पासून अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे धोरण पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पहिल्यापासूनच राबवले आहे. ‘नो एंट्री, बेशिस्त वाहतूक’ यावर कारवाई सुरू असतानाच अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आज शुक्रवार (दि. 15) पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

२० लाखासाठी तरुणाचे अपहरण

पिंपरी-चिंचवडमधील पालक आपल्या मुलांना विना परवाना वाहने हातात देतात. यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढते. शाळा महाविद्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या अल्पवयीन मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. शाळा महाविद्यालयाच्या बाहेर रोडरोमिओंचे प्रमाणही वाढले आहे. याला आळा बसावा, यासाठी अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍तांनी वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव यांना दिले आहेत.
अल्पवयीन वाहन चालकाला पकडल्यानंतर त्याच्या पालकांना पोलीस चौकीत बोलावून पोलिसांकडून पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. त्यानंतर अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांचे पालक आणि इतर कोणाचे वाहन असल्यास त्याचा मालक यांच्यावर पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत.