राजगृहावर हल्यातील सुत्रधारावर कडक कारवाई व्हावी : संजय सोनवणे

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासावर भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमांना शोधून त्यांच्यावरती कठोर कारवाई कराण्याची मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिंम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पोलीसनामा प्रतिनिधी सुधाकर बोराटे यांचेशी बोलताना दीली.

ते म्हणाले की ज्या वास्तूत इतिहास घडला, त्या वास्तूची तोडफोड करण्याचा प्रयत्न करणारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे देखील गुन्हेगार आहेत.राजगृृृह देशातील प्रत्येक नागरीकाची अस्मिता व स्वाभिमान आहे. आणी जर आमच्या अस्मीता व स्वाभीमानावर कोणी हल्ला करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही.अशा धार्मीक तेड निर्माण करणार्‍या जात्यांध शक्तीला ठेचल्याशिवाय गत्यंतर नसुन पोलीस प्रशासनाने आरोपींना लवकरात लवकर शोधुन त्याचेवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे संजय सोनवणे यांनी सांगीतले.

यावेळी पूणे जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम सभापती व सोनाई परिवाराचे प्रविण माने,पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पूणे जि.उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड,इंदापूर तालुकाध्यक्ष विकास भोसले,आरपीआय पश्चिंम महाराष्ट्र (मातंग आघाडी) सरचिटणीस नितिन आरडे, अॅड.राजू भोसले, निलेश भोसले ,नितीन गरड ,वैभव भोसले, मेघराज कुचेकर, ,कैलास भोसले, मिथुन भोसले, अंकुश भोसले, महेंद्र सोनवणे, आगंद गायकवाड, अनंता बोडके, दादासाहेब शेंडे उपस्थित होते.