कोंढवा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही
घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. तसेच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही भेट दिली. आतापर्यंत या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात यश आलेले आहे.

यावेळी बोलताना महापौरांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना दुसरा निवारा उपलब्ध करून दिला जाईल तसेच त्यांना इतर मदतही केली जाईल असं आश्वासन देखील महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे. त्याचबरोबर घटनेची संपूर्ण चौकशी करून या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, मृत मजूर हे बिहार आणि बंगालमधून आल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यात गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही भिंत भुसभुशित झाली आणि त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.

आरोग्यविषयक वृत्त – 

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा