भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा (Bhandara) जिल्हा रुग्णालयायात घडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री लागलेल्या आगीतून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबधित दुर्घटनेस जबाबदार असणा-यांवर असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.