इंदापूर तालुक्यात उद्यापासुन कडक Lockdown ! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

इंदापूर : इंदापूर तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रतिबंध करून वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने कडक उपाययोजना करण्याचे आदेश बारामती उपविभागीय दंडाधीकारी दादासाहेब कांबळे यांनी लागु केले असुन सदर आदेशाचे ऊल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.तर इंदापूर तालुक्यातील 116 गावामध्ये कडक लाॅकडाउनचे आदेश लागु करण्यात आले असुन दिनांक 11 मे 2021रोजी पहाटे एक वाजलेपासुन ते दिनांक 17 मे 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आदेश लागू राहणार असुन त्यानंतर पुढील परिस्थितीनुसार लाॅकडाउनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

इंदापूर तालुका कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती व इंदापूर नगरपरिषद कार्यक्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र कंटेन्टमेन्ट झोन जाहीर करण्यात आले असुन या परिसरातील 65 वर्षावरील व्यक्ति,अति जोखमीचे आजार,(मधुमेह,उच्च रक्तदाब,दमा,यकृृृृत व मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग,एच आय व्ही बाधीत रूग्ण, इत्यादी) असलेल्या व्यक्ति,गरोदर महिला,वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.तसेच इतर कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घरा बाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा दुकाणे, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, व सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दि.11 मे 2021 पासुनते 17 मे रोजीपर्यंत बंद राहतील.

ऑनलाईन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहतील.सार्वजनिक, खासगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णत: बंद राहतील.सार्वजनिक ठीकाणी माॅर्निंग वाक,संध्याकाळी फिरणे बंद राहील. उपहारगृृह ,बार,लाॅज, हाॅटेल्स,रिसाॅर्ट, माॅल, बाजार, मार्केट संपूर्णत: बंद राहतील.सर्व केशकर्तनालय, सलुन, स्पा,ब्युटीपार्लर दुकाने बंद राहतील,सर्व किरकोळ व ठोक विक्रिची ठीकाणे, आडत, भाजी मार्केट, मंडई, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले व कषि उत्पन्न बाजार समीती बंद राहतील.मटन,चिकन,अंडी, मासे विक्री बंद राहील. शाळा,महाविद्यालये,शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्वप्रकारचे शिकवणी वर्ग बंद राहतील.

सार्वजणीक व खासगी प्रवासी वाहणे दोन,तीन,व चार चाकी वाहणे संपूर्णत: बंद राहतील.प्रतिबंधीत क्षेत्रातील सार्वजनिक व खासगी बससेवा ट्रक, टेम्पो,ट्रेलर,ट्रॅक्टर बंद राहतील.सर्व प्रकारचे खासगी बांधकाम,कन्ट्रक्शनची कामे बंद राहतील.सर्व चित्रपटगृृृृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक व्यवसाय, नाट्यगृृृृह, कलाकेंद्र, प्रेक्षागह, सभागह, बंद राहतील.सर्व प्रकारची मंगल कार्यालये, हाॅल, लग्नसमारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील.एम आय डीसी परिसरातील अत्यावश्यक सेवामधील मेडिकल व दवाखाने वगळुन सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील.दुध विक्री व घरपोच दुध वितरण सकाळी 7 ते 9 या वेळेत घरपोच सुरू राहतील.सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा ,पशु चिकीत्सा सेवा त्याचे नियमीत वेळेत सुरू राहतील.

पेट्रोलपंप व गॅस पंप सकाळी 9 ते सायंकाळी 3 या वेळेत सुरू राहतील.व ते केवळ शासकीय वाहणे, व अत्यावश्यक सेवा पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील.एलपीजी गॅस सेवा घरपोच, गॅस वितरण नियमानुसार राहील.दैनिक, वर्तमानपत्र, नियतकालिके यांची छापाई व वितरण व्यवस्था तसेच,डिजीटल प्रिंट मिडिया यांची कार्यालये, शासकीय नियमानूसार सुरू राहतील.वर्तमानपत्र सकाळी 6 ते 9 या वेळेत सुरू राहतील. इंदापूर तालुका व इंदापूर नगरपरिषद हद्दीतील प्रतिबंधीत क्षेत्रात कोविड केअर सेंटर, को.हेल्थ सेंटर, व को. हाॅस्पिटलमध्ये रूग्णांना जेवण, नाष्टा पुरवठा करणार्‍या व्यक्ती व खानावळ चालक यांना कोविड केअर सेंटर, व को. हाॅस्पिटलमध्ये डबा पोहच देणे कामी मुभा राहील.