सावधान ! लग्न आणि इतर कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन करणं पडणार महागात, पुण्यासाठी ‘हे’ कडक नियम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण भागात गेल्या काही दिसवांपासून कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात होणारी गर्दी, मास्क न वापरणं, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणं यामुळंच ही स्थिती ओढवली आहे. अशात लॉकडाऊनचे सर्व निर्बंध उठवल्यानं ही संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांवर कडक निर्बंध घातले आहेत. याशिवाय या आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशात कार्यालय मालकाकडून नियम व अटींचं पालन करणार असल्याचं हमीपत्र घ्यावं. पन्नास व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वांजत्री, भटजी, फोटोग्राफर, व्हिडीओ चालक, सूत्रसंचालक यांच्यासह गृहीत धरावी.

मंगल कार्यालय व्यवस्थापक किंवा मालकांनी लग्न समारंभाच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर, इंफ्रा थर्मामीटर थर्मिल स्क्रीनिंग गन)चा वापर करावा. प्रवेशद्वाराजवळ उपस्थितांचं नाव, मोबाईल नंबर, स्वाक्षरी घ्यावी. इतकंच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी 5 दिवसात पोलीस ठाण्यात सादर करणं बंधनकारक केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई करा व मंगल कार्यालयांचं लायसन्स रद्द करण्याचे आदेशही देशमुख यांनी दिले आहेत.

हे पुणे जिल्ह्यासाठी नवीन नियम

– लग्न समारंभासाठी हजर रहाणाऱ्या 50 जणांची नावं पोलीस ठाण्यात सादर करावीत. (ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सूत्रसंचालक यांच्यासह असमणार आहे.) कार्यालय मालकाकडून नियम व अटींचं पालन करणार असल्याचं हमीपत्र घ्यावं.

– लग्न समारंभासाठी कमाल 50 लोक उपसथित राहतील. त्यांनी 6 फुटांचं सोशल डिस्टेंसिंग ठेवणं बंधनकारक आहे. सरमांरभाच्या ठिकाणी बसण्यासाठी आणि जेवण करताना सामाजिक अंतर राहिल अशा पद्धतीनं मार्किंग कराव. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निर्बंध ठेवावेत.

– लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपी, आचारी, वाजंत्री, भटजी व वऱ्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

– लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकणं किंवा असंही थुंकणं किंवा मद्यपान करणं यास सक्त मनाई असेल. जर याचं उल्लंघन केलं तर सदर व्यक्ती ही दंडनीय कारवाईस पात्र राहिल.

– लग्न समारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल किंवा, खुले लॉन वापरण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत एसीचा वापर टाळावा.

– मंगल कार्यालय व्यवस्थापक किंवा मालकांनी लग्न समारंभाच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर, इंफ्रा थर्मामीटर थर्मिल स्क्रीनिंग गन)चा वापर करावा. प्रवेशद्वाराजवळ उपस्थितांचं नाव, मोबाईल नंबर, स्वाक्षरी घ्यावी.

– लग्न समारंभाची जागा वारंवार हाताळले जाणारे भाग, खुर्च्या, लग्नाचा पूर्ण हॉल, किचन, जेवणाचं ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करून वारंवार निर्जंतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.

– सोशल डिस्टेंसिंगचा वापर आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन आणि अंमलबजावणी व्हावी यासाठी एक किंवा 2 प्रतिनिधी नेमावेत.

– लग्न सोहळ्याच्या सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीस यांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल करावेत.

– जर लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिक सामाजिक अंतर किंवा वरील सर्व नियम व अटींचं पालन करत नसल्याचं आढळलं तर सदर भागातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल किंवा सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.

– विवाह समारंभ व अन्य झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी 5 दिवसात पोलीस ठाण्यात सादर करावी.