दिव्यांगांचा विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ तसेच सन्मान पुर्वक वागणूक मिळावी. यासाठी विविध मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिले. तरी शासन मागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आज शुक्रवारी दुपारी शहरातील विविध मार्गाने दिव्यांगांनी एल्गार मोर्चा काढून क्युमाईन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

यात सन 2011 ते 2018 पर्यताचा दिव्यांगांसाठी असलेला ग्रा.पं,पं.स.व मनपा अतंर्गत असलेला 3% निधी व चालू वर्षाचा 5% निधी मिळावा, विना अट रेशन कार्ड मिळावे, संजय गांधी योजने अंतर्गत असलेला पगार मिळावा, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, बँक कर्ज मिळावे. अशा 21 विविध मागणी त्वरीत मान्य कराव्या यासाठी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शासनाचे,नागरीकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाध्यक्ष अँड.वंसत बोरसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करत निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. मंदाकिनी गायकवाड, संजय सरग, दिलीप दगडे, पंकज सिसोदिया, तुकाराम खरात यांचेसह मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची उपस्थिती होती.

आरोग्यविषयक वृत्त