क्रीडा अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात ‘आजी-माजी’ आमदार रस्त्यावर !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिस्तीच्या नावाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या कामाचा अतिरेक होत आहे. तसेच उदयन्मुख खेळाडूंचे भवितव्य अंधारात जात असल्याने त्यांची बदली करावी, म्हणून खेळाडूंसह विविध क्रीडा संघटना आणि आजी-माजी आमदार उतरले रस्त्यावर उतरले आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कविता नावंदे यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून त्या नेहमीच वादात राहिल्या आहेत. वाडिया पार्कमध्ये सकाळी फिरायला येणाऱ्या आबालवृद्धापासून ते थेट खेळाडूंपर्यंत सर्वांनीच त्यांची अरेरावी पाहिली आहे. कोणतीही गोष्ट समजून न घेता शिस्तीच्या नावाखाली सकाळी फिरायला येणाऱ्या वयोवृद्धांनासुद्धा त्यांनी चांगलेच सुनावले आहे. सायंकाळी खेळायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांची अरेरावी सहन करावी लागली आहे. या भागात असलेल्या मंदिरात जाण्यासाठीसुद्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी शिस्तीच्या नावाखाली मज्जाव केला होता. त्यामुळे शिस्त लागलीच पाहिजे, मात्र त्याचा अतिरेक नको. तसेच क्रीडा संघटनांना कोणत्याही विश्वासात न घेता अनेक स्पर्धा रद्द केल्याने जिल्ह्यातील खेळाडूंना स्पर्धांपासून मुकावे लागले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांची अरेरावी वाढत जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारांच्या विरोधात आज सक्कर चौक येथे जिल्ह्यातील विविध संघटनांनी आणि खेळाडूंनी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांचेसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी यांची बदली करावी, अन्यथा पुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी व क्रीडा संघटनांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like