प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवस बँका बंद ; प्रवेशद्वारा समोरच कर्मचाऱ्यांची निदर्शने

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बँकांनी आज पासून प्रलंबित मागणीसाठी तीन दिवस देशव्यापी बंद पुकरला आहे या बंदला धुळ्यातून युनायटेड फोरम आँफ बँक युनियनस वतीने सहा प्रलंबित मागणीसाठी भारतीय स्टेट बँक प्रवेश द्वार जवळ कर्मचारी एकञ येत जोरदार घोषणाबाजी करत मागण्या आमच्या हक्काच्या आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे घोषणा देत परिसर दणाणुन सोडला.

बँकेच्या प्रवेश द्वारा समोर गेटमिटींग चर्चे दरम्यान अध्यक्ष संजय गिरासे यांनी बँकेच्या कर्मचारी हिताचे बाबत कर्मचारी यांना आपण बंद का केला आहे याची माहिती करुन दिली व एकजुट राहिलो तर मागण्या मान्य होतील सगळेजण तीन दिवस सहकार्य करा असे आव्हान केले.

बँक कर्मचारीच्या सहा मागण्या
1) केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांचा किमान मासिक पगार 54000 रुपये आणि तोच बँक अधिकारीचा पगार 32000 रुपये.
2) केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडुन नियमाने 8 तास वर काम करुन घेता येत नाही या उलट बँक अधिकाऱ्याला किमान 10/11 तास काम करावे लागते.
3) केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाशी निगडीत अभ्यास व पुरेसा असावा लागतो त्या उलट बँक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बँकींग कायदा, सामान्य प्रशासन ग्राहक सेवा, आर बी आय निर्देश, आर्थिक विश्लेषण, शासकीय योजना या सर्वांचे सखोल ज्ञान असावे लागते.
4) केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना काम करताना मर्यादित उत्तरदायित्व हे अमर्यादित असते.
5) 2014 पासून आजपर्यत बँके मार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजनांची यादी खालील प्रमाणे. 1) प्रधान मंञी जनधन योजना 2) प्रधानमंञी जीवन ज्योती बिमा योजना 3) प्रधानमंञी सुरक्षा बिमा योजना 4) अटल पेन्शन योजना 5) प्रधानमंञी मुद्रा योजना  6) प्रधानमंञी रोजगार 7) प्रॉव्हीडंड फंड योजना 8) नँशनल पेन्शन सिस्टम 9) गोल्ड बॉण्ड योजना 10) आधार सेवा केंद्र 11) प्रधानमंञी आवास योजना व सर्वात बहुचर्चित नोटबंदी.
6) केंद्र शासनाने सत्तेत आल्या पासून सर्व योजना बँक मार्फत राबविल्या मग ते खाते उघडणे असो इन्शुरन्स सेवा प्रदान करणे असो, कर्ज वाटप असो, नोट बंदी या सर्व योजनांचे श्रेय सरकारने बँकेच्या जीवावर मिळविले आणि आता कर्मचाऱ्यांची पगार वाढीची मागणी गेल्या 27 महिन्या पासून प्रलंबित ठेवली आहे.

आमच आता ठरलय : 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2020 बँक बंद, 11/12/13 मार्च 2020 पुन्हा बँक बंद.

1 एप्रिल पासून बेमुदत बंद : आमचा संप बिन पगारी असतो त्यामुळे ही आमची सुट्टी नसुन त्याग आहे.
लखीत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचेकडे देण्यात आले. यावेळी अध्यक्ष संजय गिरासे, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र वडनेरे, हेमंत कुलकर्णी, लक्ष्मीकांत जोशी, आनंदा सोनवणे, शिवाजी भामरे, दिपक राव, सचिन येवले, मोहन महाले, प्रमोद वेल्हाणकर, दिपक बडगुजर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँक बंद त्यात एटीएम बंद यामुळे नागरीकांची चांगलीच गैरसोय झाली.