शिक्षक संघटनाचा काम बंद पुकारत एक दिवसीय संप

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शासकिय-निमशासकिय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक आणि ऐतिहासिक संप पुकारण्यात आला.

सोमवारी सकाळी ठिक १०-०० वाजता जिल्हा परिषद ते क्युमाईन क्लब पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. क्युमाईन क्लब समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत न्यायिक व हक्काच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी विविध संघटनातील शिक्षक, शिक्षिका एकत्र येत धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता डोक्यावर पांढरी टोपी घालून टोपीवर लाल अक्षरात जुनी पेऩ्शन एक मशीन हे लिहिले होते. हातात धरलेला फलकावर जुनी पेन्शन योजना लागू करा असे लिहिले होते.

राज्य शासन शिक्षकांची हि जुनी मागणी आहे याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाचा निषेध करत मागणी आमची हक्काची जुनी पेन्शन एकच मशीन, 14 वर्षा पासून जुना लढा लढत आहोत. केंद्रा प्रमाणे राज्यातील शिक्षकांना न्याय मिळालात पाहिजे. अशा घोषणा देत शिक्षकांनी मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता परिसर दणाणून सोडला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एस. आर. पी. बल गट क्रं. 6 पोलीस व्हॅनमध्ये बसलेले विद्यार्थी घरी जात असताना शिक्षकांचे आंदोलन त्यांनी पाहिले व पाहताच जूनी पेऩ्शन मिळालीच पाहिजे अशा घोषणा विद्यार्थांनी देत शिक्षकांच्या आंदोलनाला साथच दिली. शिक्षकांनीही टाळ्या वाजून विद्यार्थांच्या घोषणेला दाद दिली.

शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्ट मंडळासह जाऊन प्रलंबित विविध मागणी बाबत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिले. आमच्या तीव्रभावना शासन दरबारी पोहचावाव्या व त्वरीत मार्गी लावाव्यात अशी मागणी करण्यात आली. अन्यथा 11 सप्टेंबर पासून राज्यभर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते बलराज मगर, दिनेश महाले, राजेंद्र पाटील, वनराज पाटील, भरतसिंग भदोरीया, महेश मुळे, शिवानंद बैसाणे, राजेंद्र नांद्र, उमराव बोरसे, मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका आंदोलनात सहभागी झाले होते.